Home गडचिरोली अखेर हातपंपाचे काम सुरु।

अखेर हातपंपाचे काम सुरु।

113
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220414-WA0086.jpg

अखेर हातपंपाचे काम सुरु।                                                       गडचिरोली,( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
चामोर्शी तालुक्यातील आमगाव वॉर्ड क्र.1 मधिल हातपंप मागील तीन वर्षापासुन नादुरुस्त असतांना कोणतीही उपाययोजना ग्रा पं.स्तरावरुन करण्यात न आल्याने वॉर्डातील संतप्त महीलांनी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयाला ताला ठोकुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते.याची दखल पंचायत समीती प्रशासनाने घेतली असुन वॉर्डत नवीन हातपंप बांधकामाला सुरवात करण्यात आले आहे.यामुळे वॉर्डातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आमगाव महा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वॉर्ड क्र.1 मधिल निलकंठ खोब्रागडे यांच्या घराजवळ असलेले हातपंप मागील तीन वर्षापासुन नादुरुस्त असल्याने वॉर्डात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली होती.यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते.याबाबत 29 मार्चला ग्रा.प ला निवेदण सादर करुन हातपंप दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती.माञ हातपंप दुरुस्त न झाल्याने अखेर वॉर्डातील संतप्त अंसख्य 11 एप्रिलला ग्रांमपचायतीला ताला ठोकुन पंचायत समीती प्रशासनाचे लक्ष वेधले.महिलांच्या या आक्रमक भुमिकेमुळे खळबडुन जागे झालेल्या पंचायत समीती प्रशासनाद्वारे 12 एप्रिल रोजी वॉर्डात नवीन हातपंप बांधकामाला सुरवात करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here