Home नांदेड वनपरिक्षेत्रांनी हरणाचा बंदोबस्त करावे किंवा पीक नासाडीचा मोबदला द्यावे, कोत्तेवार यांची तक्रार.

वनपरिक्षेत्रांनी हरणाचा बंदोबस्त करावे किंवा पीक नासाडीचा मोबदला द्यावे, कोत्तेवार यांची तक्रार.

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20220723-WA0030.jpg

वनपरिक्षेत्रांनी हरणाचा बंदोबस्त करावे किंवा पीक नासाडीचा मोबदला द्यावे, कोत्तेवार यांची तक्रार.

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील ( युवा मराठा न्युज)

तालुक्यातील मौजे होटाळा येथील गंगाधर कोतेवार यांच्या दोन एकर शेतातील सोयाबीनच्या पिकाची हरणाच्या कळपानी नासाडी केली असल्याने हरणाच्या कळपाचा व इतर जनावरांचा वनपरिक्षेत्रांनी बंदोबस्त करावे किंवा पीक नासाडीचा मोबदला द्यावे अशी तक्रार शेतकरी गंगाधर कोत्तेवार यांनी केली आहे.
जास्तीच्या पावसाने ७० टक्के पिकाचे नुकसान झाले असून त्यात कसेबसे सावरलेले पिके फुलत असताना त्यातल्या त्यात हरणे रानडुकरे वानरे या जनावराचा उपद्रव चालूच आहे. मौजे होटाळा येथील गंगाधर दिगंबरराव कोतेवार यांची दोन एकर जमिनीतील सोयाबीन पिकाची हरणाच्या कळपानी नुकसान केलेली आहे. त्या शेतीवरच जीवन जगण्याचा व मुलांच्या शिक्षणाचा उदारनिर्वाह असल्याने वनपरिक्षेत्रांनी त्वरित हरणाच्या कळपाचा बंदोबस्त करावे किंवा झालेल्या पीक नासाडीचा मोबदला द्यावे अशी तक्रार वनपरिक्षेत्र अधिकारी देगलूर यांच्याकडे गंगाधर कोतेवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here