Home Breaking News धुळे शहरात”कंटेनमेंट झोन”ची भर..! ✍️ धुळे ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी...

धुळे शहरात”कंटेनमेंट झोन”ची भर..! ✍️ धुळे ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

111
0

🛑धुळे शहरात”कंटेनमेंट झोन”ची भर..! 🛑
✍️ धुळे ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

धुळे :⭕ धुळे शहरात काल कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची मोठी भर पडल्याने 10 कंटेनमेंट झोन (सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र) वाढले. तीन दिवसांपूर्वीच महापालिकेने 31 पैकी 13 झोन रद्द केले होते. मात्र, नव्याने दहा झोनची भर पडल्याने आता कंटेनमेंट झोनची संख्या 28 पर्यंत गेली. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आलेख खाली येईल अशी अपेक्षा असतांनाच शहरात एकाचवेळी 16 रुग्णांची भर पडल्याने प्रशासनाची झोप उडाली. संबंधित सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात महापालिकेकडून सॅनिटायझेशनसह इतर उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत.

⭕नवीन दहा झोन असे⭕

कंटेनमेंट झोन-32 (संतसेना नगर, देवपूर)
प्लॉट नंबर-9 पासुन उत्तरेला ओपन स्पेस-दक्षिणेला प्लॉट नंबर 40 पर्यंत-पश्‍चिमेला प्लॉट नंबर 44 अपार्टमेंटपर्यंत-पुढे प्लॉट नंबर 9 पर्यंत.
कंटेनमेंट झोन-33 (जयमल्हार डीसी कॉलेजजवळ, बिलाडी रोड)
चंदाबाई दुकानापासुन पूर्वेला सरदार मोरे यांच्या घरापर्यंत-दक्षिणेला नारायण अहिरे यांच्या घरापर्यंत-पश्‍चिमेला गणेश मालचे यांच्या घरापर्यंत-उत्तरेला चंदाबाई यांच्या दुकानापर्यंत.

कंटेनमेंट झोन-34 (आदर्श कॉलनी, नकाणे रोड)
आशिर्वाद क्‍लिनिक (कहान अपार्टमेंट)-पुर्वेकडे शारदा रेलन यांच्या किराणा दुकानापर्यंत-दक्षिणेकडे प्लॉट नंबर-87 श्री. जाधव यांच्या घरापर्यंत-पश्‍चिमेकडे प्लॉट नंबर 100 श्री. देशमुख यांच्या घरापर्यंत-तेथुन पुढे आशिर्वाद क्‍लिनिक (कहान अपार्टमेंट) पर्यंत.

कंटेनमेंट झोन-35 (गल्ली नंबर-4)
चैनीरोड ऊसगल्ली अग्रवाल भवन ते जयश्री सायकल मार्टपर्यंत- पुढे श्रीकांत बनछोडे यांच्या घरापर्यंत- पुढे अलोक अग्रवाल यांच्या घरापर्यंत- तेथुन पुढे ऊसगल्ली अग्रवाल भवनपर्यंत.

कंटेनमेंट झोन-36 (श्रीराज अपार्टमेंट, गोळीबार टेकडी)
गोळीबार टेकडी-कॉलनी रस्ता- कॉलनी ओपनस्पेस-लागू स्वामी अपार्टमेंट.

कंटेनमेंट झोन-37 (संभाप्पा कॉलनी)
श्री. ढाके यांच्या घरापासुन श्री. पानपाटील यांच्या घरापर्यंत- तेथुन श्री. झोटींग यांच्या घरापासुन श्री. संजय जावरे यांच्या घरापर्यंत- तेथुन पुढे श्री. भावसार यांच्या घरापर्यंत- तेथुन पुढे श्री. ढाके यांच्या घरापर्यंत.

कंटेनमेंट झोन-38 (चितोड रोड, पोलिस स्टेशनजवळ)
कुश कोल्ड्रींकपासुन सुनील जगताप यांच्या घरापर्यंत- तेथुन श्री. पवार यांच्या घरापर्यंत- तेथुन
श्रीराम प्रोव्हीजनपर्यंत- तेथुन पुन्हा कुश कोल्ड्रींकपर्यंत.

कंटेनमेंट झोन-39 (हजारखोली, सागर हॉटेलजवळ)
हनीफ सर यांच्या घरापासुन तनजेब टेलरपर्यंत- तेथुन दोस्ताना प्रोव्हीजनपर्यंत- तेथुन जिशान प्रोव्हीजनपर्यंत- तेथुन सल्लाउद्दीन सर यांच्या घरापासुन पुन्हा हनिफसर यांच्या घरापर्यंत.

कंटेनमेंट झोन-40 (चक्करबर्डी पाइप फॅक्‍टरी परिसर)
धुळे सर्व्हे नंबर 525 ची हद्द (खुली जागा) अण्णासाहेब पाटील नगर- पुढे धुळे सर्व्हे नंबर 526 ची हद्द बखळ जागा- चक्करबर्डी रोड पाण्याच्या टाकीलगत-धुळे सर्व्हे नंबर 520 पैकी बखळ जागा (सुरत बायपास)

कंटेनमेंट झोन-41 (लोकरे नगर)
उत्तर-खुली जागा- पूर्व- खुली जागा- दक्षिण- लेआऊट रस्ता- पश्‍चिम- खुली जागा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here