Home नांदेड मुखेड तालुक्यात अतिवृष्टी 1 कार तर 04 इसम वाहून गेले एकाला अथक...

मुखेड तालुक्यात अतिवृष्टी 1 कार तर 04 इसम वाहून गेले एकाला अथक परिश्रमाने वाचविण्यात यश – तालुका जलमय अनेक छोटे- मोठे तलाव ओवरफ्लो पिके आडवी

84
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यात अतिवृष्टी 1 कार तर 04 इसम वाहून गेले

एकाला अथक परिश्रमाने वाचविण्यात यश – तालुका जलमय अनेक छोटे- मोठे तलाव ओवरफ्लो पिके आडवी

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील 07 ही महसूल मंडळात दि 7 रोजी मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुकभर हाहाकार उडाला असून आखा तालुका जलमय झाला आहे कौठा रोड कडून मुखेड कडे येणारी कार मोती नाला पुरात वाहून गेली असून त्यातील एकाला रेस्क्यू ऑपरेशन करून वाचविण्यात यश आले आहे दोघांचा शोध घेणे सुरू आहे तर मेथी येथील नाल्यात एक इसम वाहून गेला आहे त्याचा ही शोध घेतला जात आहे सावरगाव वाडी येथे लघु तलाव फुटला असून मंगयाळ येथील जवळपस दोन हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आसल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुखेड तालुक्यात मागील 06 दिवसांपासून संततधार पाऊसाची धार अविरत सुरू असून दि 06 रोजी सांयकाळी अचानक पणे मुसळधार पाऊला सुरुवात झाली रात्र भर कोसळणारा पाऊसाने नदी नाले ओहोळ विहिरी तलाव जलाशये तुडूंब भरून वाहू लागली आहेत लघु तलाव मध्यम तलाव ओव्हरफ्लो झाले असून पाणी ओसंडून जोमाने वाहू लागले खरीप हंगामातील पिके पूर्णतः आडवी झाले आहेत कमळेवाडी हुन पांडुरणी मार्गे मुखेडला कार एम एच 20 डी जे 6925 ने येत असतानाच मोती नाल्यालाला पूर आल्याने पूल वरील पाण्याचा अंदाज न आल्याने कार पाण्यात वाहून गेली या मुळे एकच हाहाकार उडाला यात भगवान राठोड वय 65 वर्ष त्यांचा मुलगा संदीप राठोड वय 38 वर्ष हे दोघे ही पाण्यात वाहून गेले आहेत त्यांचा शोध घेणे सुरू असून सांयकाळ पर्यंत काही शोध लागला नसल्याचे माहिती तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी दिली आहे याच गाडीतील उद्धव देवकत्ते हा युवक वाहून जात असताना एका झाडाच्या फांदी चा आधार घेऊन झाडावर आपला स्वतःचे प्राण सुरक्षित राहण्यासाठी आसरा घेतला पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्याने कसाबसा स्वतःला सावरले पाण्याचा जोर काही ओसरत नल्सयाने उद्धव ला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न युवकांना करावे लागले
पस सभापती प्रतिनिधी लक्ष्मन पाटिल खैरकेकर व युवकाने दोर लावून पाण्यात उतरुन फिल्मी स्टाईल ने त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
मेथी येथील यादव जळबा हिवराळे वय 52 वर्ष यांचा मेथी येथील नाल्यात वाहून मृत्यू झाला आहे त्यांचे प्रेत सांयकाळी उशिरा मिळाले आहे.
सावरगाव वाडी येथील लघु तलाव फुटला असून त्यामुळे सावरगाव सावरगाव वाडी आणि मंग्याळ येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत मंगयाळ येथील 2 हजार ग्रामस्थांना सुरक्षित स्थळीं हलविण्यात आले आहे कुंदराळा मध्यम प्रकल्पात पाण्याचा जोर वाढल्याने थोटवाडी येथील रहिवासी ग्रामसेवक गोपवाड त्यांचें मुलगा वडील पाण्यात अडकून पडले आहेत पाण्याचा वेढा वाढल्याने नांदेड येथील रेस्क्यू टीम ला पाचारण करण्यात आले आहे एक बोट मागविण्यात आले असून जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी सुगावला भेट देऊन पाहणी केली आहे आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत जीप लपा विभागाचे दुर्लक्ष लघु व मध्यम प्रकल्पाला वेळोवेळी डागडुजी केले नसल्यानें तलावाची परिस्थिती बिकट झलयाचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे पावसाच्या तडाख्याने सावरगाव वाडी येथील तलाव फुटल्याचे ग्रामस्थाने सांगितले
जुना येथील लघु तलावाला तडे गेले असून परिसरातील नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे दबडे शिरूर येथील लघु तलाव ओव्हरफ्लो झालं आहे जांब बु चा तलाव ओव्हरफ्लो झालं आहे तालुक्यात अंबुलागा माकणी रस्त्यावर पूल, औराळ लोणाळ पूल पण्याने वाहुन गेले आहे सावळी व होनवडज जांभळी पूल चे नुकसान झाके उंदरी राजुरा जाहुर पाळा चाडोळा मंडलापूर तांदली यासह अन्य अनेक गावांत शेतात पाणी जाऊन खरिप हंगामात पिके आडवी झाली आहेत सलगरा गावाजवळ मण्याड नदीला पूर आल्याने अतोनात नुकसान झाले आहे अनेक गावाचा संपर्क तुटला असुन ग्रामीण भागात वीज गायवब झाले आहेत येवती येथील मुस्लिम गल्लीत पाणी घरात शिरल्याने 500 नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य धान्य पाण्यात वाहून गेले ग्रामस्ताने ग्राम पंचायत कार्यलयात सुरक्षित आसरा घेतला आहे होनवडज येथील नदी चे पाणी गावात घुसल्याने घरची पडझड झाली आहे गावात घरात पाणी घुसले आहे
मुखेड शहरातील लातूर रोड नांदेड रोड कौठा रोड वर पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने 4 तास वाहतूक खोळंबली आहे सांयकाळी उशिरा पर्यत पाऊसाची धारा सुरूच होती जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर , तहसीलदार काशिनाथ पाटील गटविकास अधिकारी तुकाराम भालके, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी मुखेडला घटनास्थळी भेटी देऊन पाहणी केली मोती नाल्यात वाहून गेलेल्या दोन इसमाचा सयकाळी उशिरा पर्यत शोध घेणे सुरू असल्याचे महसूल प्रशासने सांगितले आहे.

Previous articleमुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे.) गावास आले तळ्याचे स्वरूप
Next articleनांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे मुखेड देगलूर तालुक्यातील शेत पिकाचे नुकसान व गावातील घरी पडले तत्काळ पंचनामे करा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here