Home जालना भाजपमध्ये अशोक पांगारकर यांना डावलले जात असल्याची सकल तेली समाजाची भावना

भाजपमध्ये अशोक पांगारकर यांना डावलले जात असल्याची सकल तेली समाजाची भावना

16
0

आशाताई बच्छाव

1000271570.jpg

भाजपमध्ये अशोक पांगारकर यांना डावलले जात असल्याची सकल तेली समाजाची भावना
—————————————-समाज बांधवांनी घेतली दानवे यांची भेट
—————————————-
जालना(प्रतिनीधी दिलीप बोंडे)जालना शहरातील तेली समाजाचे अध्यक्ष तथा भाजप ओबीसी मोर्चाचे नेते माजी नगरसेवक अशोक पांगारकर यांना जालना जिल्ह्यातील भाजपमध्ये डावलले जात असल्याची भावना सकल तेली समाजाने व्यक्त केली आहे. ही बाब समाजाने खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन व लेखी निवेदन सादर करून स्पष्ट केली आहे, हे विशेष.
काल रविवारी जालना शहरातील सकल तेली समाजाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जालना शहरातील भाजपच्या स्थानिक कार्यक्रमात भाजपच्या ओबीसी मोर्चाचे नेते तसेच माजी नगरसेवक व तेली समाजाचे अध्यक्ष अशोक पांगारकर यांना भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून पक्षीय कार्यक्रमातून डावलले जात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.गत काही महिन्यापासून भाजपच्या सार्वजनिक कार्यक्रम, विविध बॅनर, पोस्टर, पॉम्पलेट इत्यादी मधून अशोक पांगारकर यांना डावलल्याचे सत्य आहे,अशी भावना या बैठकीत समाज बांधवांनी व्यक्त केली.यामुळे  समाजात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.महाराष्ट्रात सर्व जिल्हे, तालुका, ग्रामपंचायत पातळीवर भाजपच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे. मात्र जालना महानगर शहर प्रमुखांची नेमणुक प्रतिक्षेत आहे. या पदासाठी अशोक पांगारकर हे पात्र असल्याची समाज बांधवांची भावना आहे,अशोक पांगारकर यांना पक्षीय कार्यक्रमातून न डावलता त्यांना न्याय द्यावा,अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली.
या बैठकीस मनोहरराव  सिनगारे, लक्ष्मणराव क्षीरसागर, बाबुराव व्यवहारे,बाबुराव आंबेकर , नानासाहेब वाघचौरे , सखाराम मिसाळ, चंद्रकांत उबाळे ,प्रकाश राऊत,विजय राजभो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here