Home Breaking News *महाड दुर्घटनेतील मृतांच्या वारसदारांना 5 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत देण्याची...

*महाड दुर्घटनेतील मृतांच्या वारसदारांना 5 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत देण्याची घोषणा*

90
0

*महाड दुर्घटनेतील मृतांच्या वारसदारांना 5 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत देण्याची घोषणा*

रोहा.रायगड, दि.२६ (विजय पवार महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क):- रायगड जिल्ह्यातील महाड येथील काजळपुरा भागात असलेली तारिक गार्डन इमारत काल दि.24 ऑगस्ट राेजी सायंकाळी 6 च्या सुमारास कोसळली.
या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज घटनास्थळाला भेट देवून दुर्घटनाग्रस्तांचे सांत्वन केले.
श्री.वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून घटनेची संपूर्ण माहिती घेऊन तसेच पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप व नगरपरिषदेच्या अध्यक्षा श्रीमती जगताप यांच्यासोबत चर्चा करून या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या वारसदारांना मदत व पुनर्वसन विभागाकडून प्रत्येकी 4 लाख रुपये व मुख्यमंत्री सहायता निधीमधून 1 लाख रुपये असे एकूण 5 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले.
याशिवाय या दुर्घटनेत उध्वस्त झालेल्या कुटुंबांना भरीव आर्थिक मदत मिळण्यासाठी येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून ती मदत तातडीने देण्याचे निश्चित प्रयत्न केले जातील, असेही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

Previous article*कोल्हापूरच्या खासदारांचे कुठूंब कोरोना पाँझिटीव्ह*
Next article🛑 राज्यात पारंपारिक पद्धतीने गौराईचे आगमन 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here