Home Breaking News 🛑 राज्यात पारंपारिक पद्धतीने गौराईचे आगमन 🛑

🛑 राज्यात पारंपारिक पद्धतीने गौराईचे आगमन 🛑

122
0

🛑 राज्यात पारंपारिक पद्धतीने गौराईचे आगमन 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 26 ऑगस्ट : ⭕ गणरायापाठोपाठ गौराईचेही घरोघरी शुभागमन झाले आहे. अनेक ठिकाणी गौरीला महालक्ष्मी असेही संबोधले जाते. गौरींचे आगम झाल्यानंतर घरोघरी पारंपारिक पद्धतीने पूजा करून नैवेद्य दाखवण्यात आला. गौराईचे घरामध्ये आगमन झाल्यानंतर हळदीच्या ठशांनी चंदनाचे बोट लावलेल्या पावलांचे ठसे घरभर उमटवले.

गणरायाच्या आगमनानंतर घरोघरी वेध लागतात ते गौरी आमगनाचे. आज गौरींचे आगमन झाले असून घरोघरी सोशल डिस्टनसिंग पाळून गौराईचे स्वागत करण्यात आले. महाराष्टात गौरी आगमन ते विसर्जन हा तीन दिवसाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर आनंदावर विरजण पडले आहे. भाविकांनी सोशल डिस्टनसिंग व इतर नियमांचे पालन करून घरी गौरी आणल्या आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात गौरी आवाहन आणि मांडण्याच्या पद्धतींमध्ये वैविध्य आढळून येते. प्रत्येक जण आपापल्या परंपरा, पद्धती, कुळाचार यांना अनुसरून प्रतिवर्षी गौरी पूजन करतात. २५ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ०१ वाजून ५८ मिनिटांनी अनुराधा नक्षत्र असून यानंतर घरोघरी गौरीचे आगमन झाले.

महालक्ष्मीचे आगमन हा महिलांचा आवडता सोहळा असतो. घराची स्वच्छता करण्यापासून ते त्यांच्यासाठी वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांची मेजवानी आणि रेखीव, कलाकुसरीच्या दागिन्यांची भेट देऊन महिला महालक्ष्मींचे स्वागत करतात. शेवटच्या क्षणापर्यंत महिलांचे सजावटीचे काम सुरू असते. स्त्रिया रात्री जागून जय्यत तयारी करतात. यंदाही घराघरांत महालक्ष्मींच्या स्वागतासाठी नावीन्यपूर्ण साहित्याची सजावट करण्यात आली आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत सजावट साहित्य व मुखवटे यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली नव्हती. तरीही बाजारात विविध पद्धतीने सजवलेले गौरींचे विविध प्रकारचे मुखवटे बाजारात उपलब्ध होते. मुखवटे खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यासोबतच मंगळसूत्र, बांगड्या, नथ, मोत्याच्या माळा, जोडवी अशा पारंपरिक दानिन्यांसह विविध दागिन्यांची खरेदी करण्यास पसंती मिळत आहे.⭕

Previous article*महाड दुर्घटनेतील मृतांच्या वारसदारांना 5 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत देण्याची घोषणा*
Next articleऑनलाइन पेमेंट करताय ; ‘UPI’ वापरण्यापूर्वी हे वाचलेत का
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here