Home मुंबई सौ सविता तावरे स्वराज्य संघटनेच्या मुंबई विभाग अध्यक्षपदी स्वराज्य विद्यार्थी संघटना पश्चिम...

सौ सविता तावरे स्वराज्य संघटनेच्या मुंबई विभाग अध्यक्षपदी स्वराज्य विद्यार्थी संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी रुपालीताई बोबडे

86
0

आशाताई बच्छाव

IMG-20230708-WA0028.jpg

सौ सविता तावरे स्वराज्य संघटनेच्या मुंबई विभाग अध्यक्षपदी

स्वराज्य विद्यार्थी संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी रुपालीताई बोबडे

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेची वार्षिक बैठक पुणे येथे विविध विषयांवर चर्चा होऊन अतिशय आनंदाच्या वातावरणात संपन्न झाली असल्याची माहिती संघटनेचे मुख्य महासचिव कमलेश (देवा) शेवाळे यांनी दिली आहे.
स्वराज्य संघटनेचे विश्वस्त हारुन भाई शेख व योगेश पाटील यांच्या शिफारसीनुसार सौ सविता तावरे यांची पदोन्नती करतांना मुंबई विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.तसेच स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेची यशस्वी घोडदौड पाहता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे व राष्ट्रीय मुख्य महासचिव कमलेश शेवाळे यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वराज्य विद्यार्थी संघटना स्थापना करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि सर्व विश्वस्त व संचालक यांच्या समवेत हा ठराव मंजूर करण्यात आला. स्वराज्य विद्यार्थी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी सौ रूपालीताई बोबडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी स्वराज्य संघटनेचे संस्थापक दीपक जी कांबळे, राष्ट्रीय महासचिव कमलेश देवा शेवाळे, विश्वस्त भरत नजन, संचालक प्रशांत निकम सौ मजुंषाताई डोईफोडे, महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष जावळे, पश्चिम महाराष्ट्र संघटक संग्राम पाटील, वैशाली कांबळे, नगमा शेख, ज्योती आदक, प्रगती कदम, श्वेता गाडे, मनीषा खोसे, साधना रायबोले, साधना भोरे, किरण साव, सुरेखा सुरवसे, अनिता रंधवे, कुंता आगलावे, अनिता होळकर, अशा आवर्त, आशा घुले, अश्विनी गायकवाड, मनीषा शिंदे, पंचशीला गायकवाड, संचिता गोसावी, संगीता ठोंबरे, संगीता मिश्रा,संजीवनी सुरवसे, अश्विनी ढोमे, सुजाता चोरगे, वैशाली चोरगे, सोनाली गायकवाड,राजूबाई शिंदे, स्वप्नाली खरमाळे, मनीषा कांबळे, रूपाली तांबे, प्रीती आझाद, सळसवणे, गणेश मोरे,गणेश आवटी, सूर्यकांत भोर, प्रकाश पोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ संगिता बोराडे तसेच विशाल बोराडे व त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेतले आहेत.

बैठकीत विविध विषयांवर चर्चा, ओळखपत्र वाटप व सत्कार
बैठकीत संस्थापक अध्यक्ष दीपक जी कांबळे, राष्ट्रीय महासचिव कमलेश देवा शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली
संघटनेचे सर्व विश्वस्त व संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत
स्वराज्य संघटनेची कार्यपद्धती ,संघटनेची ध्येय धोरणे आधी विषयांवर साधक बाधक चर्चा झाली असून या बैठकीचे आयोजन संघटनेच्या संचालक तथा पुणे महिला जिल्हाध्यक्ष संगीता बोराडे यांनी केले होते.बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ ग्रेसी मॅडम होत्या. बैठकीच्या प्रारंभी डॉ ग्रेसी मॅडम व सर्व विश्वस्त संचालक यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमा पुजन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांचा पुणे जिल्हा संघटक विशाल बोराडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.संघटनेचे विश्वस्त हारुन भाई शेख, योगेश पाटील, उमेश काशीकर, सौ. धनश्री उत्पात, सौ सविता तावरे यांनी यांनी मनोगत व्यक्त केले .पुणे जिल्ह्य़ातील पदाधिकारी यांना ओळखपत्र व नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले.

संघटनेने केलेली निवड सार्थ ठरवणार
आज स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेची वार्षिक बैठक संपन्न झाली असून यात मुंबई विभाग सचिव पदावरून मला संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे ,राष्ट्रीय महासचिव कमलेश देवा शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व विश्वस्त व संचालक यांनी मुंबई विभाग अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे मनापासून आभार मानते.तसेच सर्वांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने केलेली
निवड सार्थ ठरवणार.

सौ सविता तावरे/पानसरे- नवनियुक्त अध्यक्ष मुंबई विभाग (साकीनाका मुंबई)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here