Home नाशिक व-हाणे प्रकरणात युवा मराठा महासंघाचा एल्गार उद्या मंगळवारपासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषणास...

व-हाणे प्रकरणात युवा मराठा महासंघाचा एल्गार उद्या मंगळवारपासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषणास सुरुवात

228
0

आशाताई बच्छाव

20230710_191839-BlendCollage.jpg

व-हाणे प्रकरणात युवा मराठा महासंघाचा एल्गार
उद्या मंगळवारपासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषणास सुरुवात
मालेगांव,(प्रतिनिधी विजय चांदणे)- संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेल्या व-हाणे प्रकरणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार थेट कार्यवाही करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ उद्या मंगळवारपासून युवा मराठा महासंघाने पुन्हा एकदा एल्गार पुकारला असून ,मालेगांव पंचायत समितीसमोर आमरण उपोषण आंदोलनास सुरुवात होत आहे.
याबाबत सविस्तर वृत असे की,नाशिकच्या मालेगांव जवळील व-हाणे गावातील गावठाणात असलेल्या सन २०२० पासून युवा मराठा परिवार व आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेच्या ताब्यात व वापरात असलेल्या मुद्द्यावरुन सुरु झालेल्या लढयात व-हाणे ग्रामपंचायतीच्या कागदोपत्री खोटया-नाटया बनवाबनवीचे बरेच प्रकरण, व प्रोसिडिंग बुकात ग्रामसभेला हजर नसलेल्या नागरीकांच्याही खोटया व बनावट सहया करुन,कागदोपत्री फेरफार व वेगवेगळ्या स्वरुपाचे बनावट कागदपत्रे बनविण्याच्या गंभीर मुद्द्यांवर युवा मराठा महासंघाच्या मागणीनुसार नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मितल यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन करुन या प्रकरणाची सखोल चौकशी करुन नुकताच अहवाल सादर केला आहे.चौकशी समितीच्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, व-हाणे प्रकरणातील आजपर्यंत झालेल्या सर्वच ग्रामसभा प्रोसिडिंगवरील सहयांची पडताळणी करुन, कागदोपत्री झालेल्या फेरफारांची सुध्दा तपासणी करुन मालेगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी सबंधितावर गुन्हे दाखल करावेत.असे स्पष्ट चौकशी अहवालात नमूद केलेले असतानाही गटविकास अधिकारी हेतूत याप्रकरणी दुर्लक्ष करुन हे प्रकरण टाळण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या निषेधार्थ हे आमरण उपोषण आंदोलन केले जात आहे.

चौकशी समितीने दिलेल्या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की,मालेगांवच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसभा प्रोसेडींग वरील सगळ्या सहयांची पडताळणी करुन दोषी असलेल्या सबंधितावर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करावी.त्याशिवाय कागदोपत्री खोटे नाटे केलेले फेरफार याचीही तपासणी व्हावी असे चौकशी समितीने दिलेल्या अहवालात स्पष्ट नमूद केलेले असताना,गटविकास अधिकारी भरत वेंदे मात्र आपली नैतिक जबाबदारी टाळून राजकीय दबावाखाली काम करत आहेत.आणि युवा मराठा महासंघाचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी ज्या वेळेस वेंदेना चौकशी अहवालाची तात्काळ अंमलबजावणी करा म्हणून सांगितले.त्याच वेळी गटविकास अधिकारी भरत वेंदेनी मला अगदी एखाद्या लहान पोराटोरा सारखे उतरे दिलीत,माझ्या कार्यालयाचे काम संपलेले आहे.आता तुमचे माझ्याकडे काहीही राहिलेले नाही.त्यामुळे तुम्ही मला काहीही सांगायचे नाही.हि वेंदेची बालिश पणाची उतरे खरी समजायची की चौकशी समितीचा अहवाल? फक्त आणि फक्त कागदोपत्री खोटे नाटे खेळ खेळणा-या गुन्हेगारांना वाचविण्यासाठी प्रशासनाचा केवढा मोठा आटापिटा सुरु आहे.हे लोकशाहीला घातक असून,चौकशी समितीच्या अहवालानुसार गटविकास अधिकारी वेंदेनी ग्रामसभेच्या प्रोसेडींग बुकावर करण्यात आलेली प्रशांत बच्छाव याची सही हस्ताक्षर तज्ज्ञकडून तपासून इतरही झालेल्या बोगस सहयांची व कागदोपत्री फेरफारची तात्काळ अंमलबजावणी करुन सबंधित दोषीवर गुन्हे दाखल करावेत,अन्यथा तोपर्यंत आता उपोषण आंदोलनातून कदापीही माघार नाही.
राजेंद्र पाटील राऊत
उपोषणकर्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here