Home महाराष्ट्र शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मालेगाव तालुका प्रशासनाची तयारी पूर्ण:तहसिलदारनितिनकुमार देवरे

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मालेगाव तालुका प्रशासनाची तयारी पूर्ण:तहसिलदारनितिनकुमार देवरे

93
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

Screenshot_20230712-203232_Google.jpg

मालेगाव, दिनांक 11 जुलै, 2023 (उमाका वृत्तसेवा):

‘शासन आपल्या दारी’अभियांनातर्गत आयोजित नाशिक जिल्हास्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 15 जुलै रोजी नाशिक येथे होणार आहे. या कार्यक्रमाची पूर्व तयारी बैठक बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे व जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी आज घेतली. त्याअनुषंगाने मालेगाव तालुका प्रशासनाने या कार्यक्रमाची तयारी केली असून तालुक्यातील एकूण दहा हजार लाभार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचे मालेगावचे तहसिलदार नितिनकुमार देवरे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत 15 जुलै रोजी मालेगाव तालुक्यातून एकूण 40 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. मंडळ मुख्यालयातून या बसेस दिनांक 15 जुलै रोजी सकाळी 7 वाजता लाभार्थ्यांना घेऊन नियोजित स्थळी निघणार आहेत. यासाठी एकूण 120 कर्मचाऱ्यांची नेमणूक लाभार्थी घेऊन जाण्यासाठी व त्यांना परत आणण्यासाठी करण्यात आली आहे. तसेच बसेसमध्ये आरोग्य सेवकांची देखील नियुक्ती केली असून प्रथमोपचार सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे, अशी माहिती तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी  यावेळी दिली.

त्याअनुषंगाने मालेगांव तालुक्यातील विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी तालुका प्रशासनाने तयारी केली असून एकूण दहा हजार लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. यात रेशनकार्ड, सेतू दाखले, घरकुल योजना, ठिबक योजना, पोकरा योजना व वैद्यकीय विभागामार्फत योजनेचे लाभ कार्यक्रमात दिले जाणार आहे.

या बैठकीस दूरदृष्यप्रणालीद्वारे उप विभागीय कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, पुरवठा निरीक्षक पी. एस. काथेपूरी, गट विकास अधिकारी भरत वेंदे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Previous articleव-हाणे प्रकरणात युवा मराठा महासंघाचा एल्गार उद्या मंगळवारपासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषणास सुरुवात
Next articleएजंट-अभिकर्ता नियुक्तीसाठी 18 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here