Home Breaking News नागपूर मध्यवर्ती कारागृहाचा अजब-गजब फरमान..! जीव गेला तरी बेहत्तर पण ड्यूटी करा...

नागपूर मध्यवर्ती कारागृहाचा अजब-गजब फरमान..! जीव गेला तरी बेहत्तर पण ड्यूटी करा 🛑 ✍️ नागपूर :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

109
0

🛑 नागपूर मध्यवर्ती कारागृहाचा अजब-गजब फरमान..! जीव गेला तरी बेहत्तर पण ड्यूटी करा 🛑
✍️ नागपूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नागपूर :⭕ मध्यवर्ती कारागृहातील कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल बुधवारी दुपारीच जेल प्रशासनाकडे आला होता. मात्र, सायंकाळपर्यंत कर्मचाऱ्यांकडून ड्युटी करवून घेण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले नव्हते, अशी धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे फक्‍त ड्युटी पूर्ण घेण्यासाठी जेलरने कर्मचाऱ्यांसह कैद्यांच्या जीवाशी खेळ केल्याची चर्चा आहे.

जेलमधील विश्‍वसनीय सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार, कारागृह अधीक्षक अनुप कुमरे यांनी कारागृह महासंचालकांकडून आलेल्या पत्राला केराची टोपली दाखवत कर्मचाऱ्यांना सक्‍तीने कारागृहात लॉकडाउन केले. त्यामध्ये कर्मचाऱ्यांची योग्य प्रकारे आरोग्य तपासणी करण्यात आली नाही.
लॉकडाउन असताना कारागृहात मनमानी कारभार सुरू ठेवला.

डिलिव्हरी बॉयच्या हातून हल्दीराममधून केक बोलावण्यात आला. तो केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. बाहेरून आलेला डिलिव्हरी बॉय बाधित असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच जेलमध्ये कोरोना ब्लास्ट झाल्याचे बोलले जाते. कारागृहातील महिला कर्मचाऱ्यांना लहान बाळ किंवा कुटुंब याचा विचार न करता दमदाटी करीत कारागृहात लॉकडाउन करण्यात आल्याचा आरोप होत आहे…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here