Home नाशिक पांधन रस्त्यांचा प्रशासनास विसर पडला की काय ?

पांधन रस्त्यांचा प्रशासनास विसर पडला की काय ?

37
0

आशाताई बच्छाव

IMG-20220705-WA0014.jpg

पांधन रस्त्यांचा प्रशासनास विसर पडला की काय ?

युवा मराठा न्युज नेटवर्क.

संदीप गांगुर्डे पिंगळवाडे
ग्रामीण भागातील बहुतांशी शेतकरी वर्ग हा शेत मळ्यात वास्तव्यास आहेत. तसेच त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांना वेळोवेळी या पांधण रस्त्यांचा वापर करावा लागतो. त्यात शाळकरी मुले,मजूर वर्ग, महिला वर्ग इत्यादी घटकांचा रस्त्याचा वापर होत असतो परंतु आजच्या घडीला पांधण रस्त्यांची अवस्था फार दयनीय आहे. यात ठिक ठिकाणी खड्डे पावसाने भरले त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल मुख्य रस्त्याला आणणे फार अवघड होत आहे .तसेच शाळकरी मुलांना पावसाळ्यात तर मोठी कसरतच करावी लागते. याच अनुषंगाने ग्रामस्थांनी वेळोवेळी लोकनियुक्त पदाधिकारी यांना लेखी निवेदन दिलेले आहेत. या निवेदनाद्वारे पिंगळवाडे ते विरगावपाडे, पिंगळवाडे ते ताहाराबाद, पिंगळवाडे ते विजयनगर या पांधण रस्त्यांचा समावेश आहे. पण मात्र लोकनियुक्त पदाधिकारी यांनी पूर्णपणे डोळे झाक केले आहे किंवा त्यांना रस्त्यांचा विसर पडला असावा. त्यातच ग्रामपंचायत या कामासाठी सक्षम आहे परंतु ग्रामपंचायतीकडे पुरेशी निधीची कमतरता असल्यामुळे त्यांच्या मार्फत हे रस्ते मजबूती करणे शक्य नाही. याकरिता जिल्हा परिषद किंवा आमदार निधीची आवश्यकता असते. तरीसुध्दा अशा परिस्थितीत स्थानिक शेतकऱ्यांनी शासनाच्या निधीची वाट न बघता वेळोवेळी स्वतःच्या खिशाला झळ देऊन हे रस्ते तात्पुरत्या स्वरूपात सुधारणा केली आहे. पण मात्र पुन्हा हे रस्ते स्वखर्चातून सुधारणा होणे शक्य नाही. स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्या नुसार जे पण पांधण रस्ते आहेत त्यांची अवस्था आज फार वाईट आहे. त्याचे खडीकरण किंवा डांबरीकरण होणे गरजेचे आहे व विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची फार गरजेचे आहे.

Previous articleजेष्ठ नेते रंगराव पाटील झाले भावुक
Next articleशिक्षकांना शाळा अतिरिक्त कामामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याच्या मार्गावर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here