Home Breaking News महाराष्ट्रात ‘कामगार ब्युरो’ ची स्थापना, येत्या 8 दिवसांत नोंदणीला होणार सुरूवात

महाराष्ट्रात ‘कामगार ब्युरो’ ची स्थापना, येत्या 8 दिवसांत नोंदणीला होणार सुरूवात

117
0

भूमिपुत्रांसाठी नोकरीची मोठी संधी!

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई सह भारतामध्ये 24 मार्चपासून कोरोना व्हायरसचं संकट घोंघावत असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. आता हा लॉकडाऊन चौथ्या टप्प्यात जाणार हे अटळ आहे. पण या कोरोना व्हायरस भोवती अडकून राहून सारे व्यवहार ठप्प करणं अर्थव्यवस्थेसाठी मोठं धोकादायक आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये असणार्‍या काही उद्योगांना आता सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांनी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सारखी शहरं सोडली. पण त्याचा फटका बसून नये म्हणून आता महाराष्ट्रात राज्य सरकारने ‘कामगार ब्युरो’ सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.यामुळे भूमिपुत्रांना नोकरीची मोठी संधी खुली होण्याची शक्यता आहे. दरम्यान येत्या 8 दिवसांमध्ये नोंदणी सुरू होईल अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात सुरू होणारी कामगार ब्युरो ही अवघ्या सात दिवसांत कामगारांना प्रशिक्षण देऊन उद्योगांची गरज पुरवणार आहे. उद्योगांना कुशल, अकुशल मजूर, कामगार मोठ्या संख्येने उपलब्ध होतील. असा विश्वासही सुभाष देसाईंनी व्यक्त केला आहे. राज्यातील कामगारांची कुशल, अंशत: कुशल आणि पूर्ण कुशल कामगारांची नोंदणी उद्योगांच्या गरजेप्रमाणे कामगार पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे. दरम्यान राज्याच्या कामगार विभाग, उद्योग विभाग, कौशल्य विकास विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नातून हीनोंदणी केली जाणार आहे

Previous articleसिनिअर ठाकरे विधान परिषदेत गेल्याने पितापुत्रांच्या चार जोड्या विधिमंडळात
Next articleकोणतीही परीक्षा न घेता मेडिकलच्या जवळपास 30 हजार जागा भरणार- आरोग्य मंत्री राजेश टोपे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here