Home Breaking News कोणतीही परीक्षा न घेता मेडिकलच्या जवळपास 30 हजार जागा भरणार- आरोग्य मंत्री...

कोणतीही परीक्षा न घेता मेडिकलच्या जवळपास 30 हजार जागा भरणार- आरोग्य मंत्री राजेश टोपे

154
0

पॉलिटिक्स स्पेशल लाइव्ह
राज्य सरकारने वैद्यकीय क्षेत्रातील सर्व रिक्त जागा महिनाभरात भरण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही परीक्षा न घेता, पूर्वीच्या शैक्षणिक पातळीवरील परीक्षांवरुन या जागा तातडीने भरल्या जातील, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग तसंच राज्यभरातील विविध महापालिका रुग्णालयांमध्ये जवळपास 30 हजार जागा रिक्त आहेत. या सर्व जागा महिना-दीड महिन्यात भरणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागात 17 हजार 337 जागा रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागात 11 हजार जागा रिक्त आहेत. राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये हजारो जागा रिक्त आहेत.या सगळ्या जागा भरण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सर्व जागा आम्ही महिनाभरात शंभर टक्के जागा भरणार आहोत. त्यासाठी वेगळा विभाग तयार केला जात आहे. परीक्षा न घेता त्यांच्या जुन्या ज्या परीक्षा असतील जसे नर्सिंग कॉऊन्सिल, MBBS ची झालेली परीक्षा, पीजीचे मार्क असतील या आधारावर या जागा भरल्या जाणार आहेत, असंही राजेश टोपे म्हणाले आहेत.

Previous articleमहाराष्ट्रात ‘कामगार ब्युरो’ ची स्थापना, येत्या 8 दिवसांत नोंदणीला होणार सुरूवात
Next articleराज्य सरकारची “बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजना” सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार- कृषिमंत्री भुसे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here