Home महाराष्ट्र शिक्षकांना शाळा अतिरिक्त कामामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याच्या मार्गावर

शिक्षकांना शाळा अतिरिक्त कामामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याच्या मार्गावर

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20220704-WA0019.jpg

शिक्षकांना शाळा अतिरिक्त कामामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याच्या मार्गावर
युवा मराठा न्यूज नेटवर्क
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना अध्यापन व्यतिरिक्त शाळा बाह्य मतदार नोंदणीच्या कामांमुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अतोनात नुकसान होत आहे

सलग दोन वर्ष कोरोणा या महामारीमुळे बहुतेक शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांना घरी ऑनलाईन अभ्यास करावा लागत होता. परंतु बहुतेक मुलांकडे मोबाईल नसल्याने हे विद्यार्थी शिक्षणापासून पूर्णपणे वंचित राहिले होते. पण मात्र कोरोनाचे प्रमाण कमी झाले व शाळा पूर्व सुरू झाल्या पुन्हा विद्यार्थी शाळेत येऊ लागले. पण मात्र बहुतांश प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक संख्या प्रमाणापेक्षा कमी आहे काही शाळांमध्ये एक दोन शिक्षक एक ते चार वर्ग सांभाळतात. अध्यापनाचे काम करताना अशातच शासनाने नेमून दिलेल्या मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे(BLO) या नियुक्तीमुळे शिक्षकांना आपला वर्ग सोडून आपले अध्यापनाचे काम सोडून या मतदार नोंदणी याद्यांचे काम करावे लागते. साहजिकच उर्वरित शिक्षकांना वर्ग सांभाळावा लागतो. अर्थातच मुलांच्या शैक्षणिक नुकसान होत आहे.
याच पार्श्वभूमीवर नागपूर खंडपीठ नुकत्याच आदेश जाहीर केला की शालेय कामकाजा दरम्यान शिक्षकांना निवडणुकीचे कामे देता येणार नाही. या आदेशाचे महाराष्ट्रभर अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा सर्वच शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्याकडून होत आहे तसेच पूर्णवेळ शिक्षकांना अध्यापनासाठी देण्यात यावा.या मतदार नोंदणीचे कामे इतरत्र शासकीय कर्मचारी यांच्याकडे देण्यात यावे जेणेकरून प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही……

Previous articleपांधन रस्त्यांचा प्रशासनास विसर पडला की काय ?
Next articleकरंजाड मुंगसे रस्त्याच्या संथ गतीच्या कामामुळे प्रवासी हैरान..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here