Home नाशिक करंजाड मुंगसे रस्त्याच्या संथ गतीच्या कामामुळे प्रवासी हैरान..

करंजाड मुंगसे रस्त्याच्या संथ गतीच्या कामामुळे प्रवासी हैरान..

34
0

आशाताई बच्छाव

IMG-20220702-WA0019.jpg

करंजाड मुंगसे रस्त्याच्या संथ गतीच्या कामामुळे प्रवासी हैरान..

युवा मराठा न्यूज नेटवर्क

संदीप गांगुर्डे पिंगळवाडे
करंजाड ते मुंगसे रस्त्याची सुधारणा करण्याचे काम साधारण मार्च महिन्यापासून सुरू आहे. यात साईट पट्टया वाढवणे व डांबरीकरण करणे तसेच पिंगळवाडे गावाजवळ प्राथमिक आरोग्य केंद्रा शेजारी रस्त्याची उंची वाढवणे व पाण्याचा विसर्ग फरशी पुलाच्या मार्फत बाहेर काढणे. परंतु संबंधित ठेकेदाराने या कामाची सुरुवात मार्च महिन्यापासून केली होती पण मात्र अद्याप काम पूर्ण झाले नाही. अर्धवट कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.कारण ज्या ठिकाणी रस्ता उंच करण्यात आला आहे अशा ठिकाणी अद्याप डांबरीकरण झाले नाही. त्यावर साध्या पद्धतीने मुरूम, माती टाकून तात्पुरता रस्ता करण्यात आला आहे. थोडा जरी पाऊस आला तरी रस्त्यावर चिखल होत आहे. या रस्त्याचा वापर पिंगळवाडे, मुंगसे, विजयनगर, जाखोड,नरकुळ या गावांना त्रास सहन करावा लागत विशेष बाब म्हणजे नरकोळ येथे आशापुरी देवस्थान आहे. या देवस्थानात भाविकांची गर्दी सतत चालू असते. यात शाळकरी मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या रस्त्यालगत आदिवासी वस्ती वास्तव्यच आहे. यामुळे त्यांनाही हा त्रास होत आहे काही अंतरावर अंगणवाडी केंद्र आहे. अंगणवाडी केंद्र जवळ मातीचा ठिग टाकला आहे. अशा अनेक समस्यांना स्थानिक व प्रवासी वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व यांनी गांभीर्याने लक्ष देण्याचे गरज आहे.

Previous articleशिक्षकांना शाळा अतिरिक्त कामामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याच्या मार्गावर
Next articleनांदेड जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 16.40 मि.मी. पाऊस
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here