Home गडचिरोली शेती आणि शेतकरी हाच विकासाचा केद्रबिंदू: आ.सुधीर मुनगंटीवार मूल येथील कृषीमहाविद्यालयाच्या कामाला...

शेती आणि शेतकरी हाच विकासाचा केद्रबिंदू: आ.सुधीर मुनगंटीवार मूल येथील कृषीमहाविद्यालयाच्या कामाला आता येणार वेग!

34
0

आशाताई बच्छाव

IMG-20220706-WA0021.jpg

शेती आणि शेतकरी हाच विकासाचा केद्रबिंदू: आ.सुधीर मुनगंटीवार

मूल येथील कृषीमहाविद्यालयाच्या कामाला आता येणार वेग!

निधीसाठी तात्काळ प्रस्ताव पाठविण्याच्या आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचना

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): शेती आणि शेतकरी हाच राज्याचा विकासाचा केंद्रबिंदू मानून कृषी क्षेत्रात संशोधन आणि नविनतम् प्रयोग करणे हेच आपले ध्येय असायला हवे; त्यादृष्टीने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या कामाला प्रशासकीय स्तरावर गती देण्यासाठी अधिकाऱ्यांनी गांर्भीयाने लक्ष द्यावे असे आवाहन व तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना लोकलेखा समितीप्रमुख, आ.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिल्या. येत्या वर्षभरात हे कृषी महाविद्यालय परिपूर्ण व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मूल येथील कृषी महाविद्यालयासाठी आवश्यक इमारत बांधकाम, पदभरती, वेतनेतर अनुदान आणि इतर सोयी सुविधांसंदर्भात आढावा घेण्यासाठी आ.मुनगंटीवार यांनी विधानभवन येथे कृषी विभागाच्या प्रधान सचिवांसह अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
१३३ कोटी रुपयांचा मूळ प्रस्ताव असलेल्या कृषी महाविद्यालयाला दिनांक २८.०२.२०१९ रोजी मान्यता मिळाली. या महाविद्यालयाच्या इमारतीत मुला-मुलींचे वसतीगृह तसेच इतर शैक्षणिक सुविधांकरिता आवश्यक बांधकामास मान्यता देण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी कृषी पदवीधर अभ्यासक्रमाची सुविधा निर्माण करणे. बदलत्या हवामानानुसार कृषी व्यवसाय व शेती उद्योग, कृषी तंत्रज्ञान या विषयाच्या प्रसार, प्रचार व्हावा व शेतकऱ्यांनाही फायदा व्हावा या हेतूने आ.सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पुढाकार घेतला. मूल तालुक्यातील मरोडा/सोमनाथ येथे हे कृषी महाविद्यालय होवू घातले आहे. कृषी महाविद्यालयासाठी पहिल्या टप्प्यात ६४.५९ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता आ.सुधीर मुनगंटीवार यांच्याच पाठपुराव्यामुळे मिळाली; परंतु निधी उपलब्ध झाल्याने कामाला गती मिळाली नाही. यापुढे मात्र निधीसाठी काम थांबणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देवून या कामाकरिता ३५ कोटीची पुरवणी मागणी करण्यासंदर्भात सूचनाही त्यांनी आज दिल्या.
मूळ प्रस्तावासंदर्भातील व्यवस्थित विश्लेषण मांडून हे कृषी महाविद्यालय उत्तम होईल याबाबत प्रेझेटेशन करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. वेतनेतर अनुदानाचे १ कोटी ८० लक्ष रुपये तातडीने वितरीत करण्याच्या सूचना देखील आ.सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
या बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव श्री एकनाथ डवले, वित्त विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला,जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, बांधकाम विभाग सचिव प्र. द. नवघरे, कार्यकारी अभियंता श्री भास्करवार, सहसचिव विवेक दहिफळे आदी अधिकारी उपस्थित होते.

Previous articleमाजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी स्वतः रक्तदान करून साजरा केले आपलं वाढदिवस..!!
Next articleभारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी हे थोर विचारक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here