Home गडचिरोली महामहीम राष्ट्रपती जी द्रौपदी मूर्मु यांच्या फोटोंचे आमदार डॉ देवराव होळी यांचे...

महामहीम राष्ट्रपती जी द्रौपदी मूर्मु यांच्या फोटोंचे आमदार डॉ देवराव होळी यांचे कडून विविध आदिवासी वसतिगृह व शासकीय कार्यालयात वितरण…!

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20220725-WA0052.jpg

महामहीम राष्ट्रपती जी द्रौपदी मूर्मु यांच्या फोटोंचे आमदार डॉ देवराव होळी यांचे कडून विविध आदिवासी वसतिगृह व शासकीय कार्यालयात वितरण…!

जिल्ह्यातील तमाम आदिवासी वसतिगृह व शासकीय कार्यालयात महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू याच्या फोटोंचे वितरण करणार!!-आं,डॉ देवराव होळी

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गडचिरोली:राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्याबद्दल महामहीम मा. द्रोपदी मुर्मू जी यांचे तमाम आदिवासी समाजाकडून मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा ! देत प्रदीर्घ काळ केलेली जनसेवा आणि आदिवासी समाजात शैक्षणिक जनजागृतीसाठी केलेल्या कार्याचा दांडगा अनुभव नक्कीच मार्गदर्शक ठरेल. व त्यांच्या नेतृत्वात देश अधिकाधिक यशस्वी वाटचाल करेल तथा आदिवासी समाजाने महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मर्मू यांच्या कडून प्रेरणा घ्यावा असा विश्वास गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी व्यक्त केली व आज देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेऊन पद ग्रहण केल्याबद्दल महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मर्मु यांच्या फोटोंचे आमदार डॉ देवराव होळी यांचे कडून गडचिरोली येथील आदिवासी मुलांचे वसतिगृह ,व विविध शासकीय कार्यालय , पंचायत समिती कार्यालय गडचिरोली , तहसील कार्यालय गडचिरोली , आदिवासी मुलींचे वसतिगृह व विविध शासकीय कार्यालय, येथे पंचायत समितीचे उपसभापती भाजप नेते विलास पाटील दशमुखे , भाजपा गडचिरोली तालुका महामंत्री हेमंत भाऊ बोरकुटे , संतोष दशमुखे ,मनोज किरमिरे यांच्या हस्ते*वितरण करण्यात आले या फोटोंच्या वितरण समयी प्रामुख्याने तहसीलदार गणवीर साहेब , गटविकास अधिकारी , पदा साहेब ,गृहपाल काळे श्रीमती मडावी यांनी महामहीम राष्ट्रपती यांच्या फोटोंच्या स्वीकार केला

Previous articleराष्ट्रपती दौपदी मुर्मू यांचा शपथविधी संपन्न
Next articleगावकऱ्यांच्या गावात जाणाऱ्या रस्त्याला अर्धांगवायु
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here