Home बुलढाणा गावकऱ्यांच्या गावात जाणाऱ्या रस्त्याला अर्धांगवायु

गावकऱ्यांच्या गावात जाणाऱ्या रस्त्याला अर्धांगवायु

30
0

आशाताई बच्छाव

IMG-20220725-WA0053.jpg

गावकऱ्यांच्या गावात जाणाऱ्या रस्त्याला अर्धांगवायु

युवा मराठा न्यूज वेब पोर्टल रवि शिरस्कार संग्रामपूर

संग्रामपुर तालुक्यातील दानापुर खुर्द या गावाला गावात येण्या-जाण्याकरिता गावकऱ्यांना गावाजवळील गट न.०२व गट न.०३ यांच्या शेतातून असलेला रस्ता मागील एक महिन्यांपूर्वी या शेतकऱ्यांनी गावकाऱ्यांसोबत वाद घालुन बंद केला आहे या शेताच्या बाजुला वान नदीचे पात्र असल्यामुळे गावकऱ्यांना तसेच गावातील सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना, गावातील वयोवृद्ध महिला पुरुषांना तसेच आजारी पडलेल्या रुग्णांना रस्त्याच्या अडचणी मुळे रात्री बे रात्री नदीच्या काठावरून ये जा करून नाहक त्रास सहन करावा लागत आहे सध्या नदी पात्रात पाणी कमी असल्यामुळे गावात जाण्याकरिता एवढाच नदीकाठ शिल्लक उरून आहे त्याचप्रमाणे या गावात या पाऊल वाटेने दुचाकी वाहनसुद्धा नेले म्हणजे तो बाहुबली ठरेल!! अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
त्यामुळे या गावाच्या रस्त्याला जनु अर्धांग वायू झालेला आहे अशी चर्चा होत आहे.
आज दिनांक २५ जुलै रोजी दानापूर खुर्द येथील संपुर्ण रहिवासी मुला बाळांसोबत ,शाळेतील दप्तर घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांसह ट्रक्टर मध्ये बसुन संग्रामपूर तहसील कार्यालयामध्ये रस्त्याच्या मागणी करण्याकरिता गेले असता
तहसीलदार साहेब यांच्या सांगण्यानुसार लगेच नायब तहसिलदार चव्हाण यांनी,मंडळ अधिकारी बोराखडे, तलाठी दाभाडे,पोलीस पाटील शालीग्राम कासकर, कोतवाल विठ्ठल मिरगे यांच्या सह दानापूर खुर्द पाउलवाटीची पाहणी केली आणी या गावाच्या रस्त्या करिता असलेल्या प्रश्नाची दुर्दशा झालेली परिस्थिती त्यांच्या लक्षात आली गावकऱ्यांच्या समक्ष नदीपात्राच्या काठी असलेल्या गट न.२ व ३ च्या शेतकऱ्यांना नायब तहसीलदार यांनी,तसेच इतर आधीकाऱ्यांनी समज दिला मात्र या भानगडी चा उलगडा निघाला नाही आमच्या शेतातून रस्ता नाही,आम्ही पुढे कोर्टाने घेऊ असे उत्तरे त्यांना मिळाली नाईलाजाने नायब तहसीलदार साहेब यांनी दानापूर खुर्द या गाववासीयांना रस्त्याच्या प्रश्नाचे सर्व कागदपत्रे तसेच गावाचा ठराव मंजूर करून दिवाणी न्यायालय संग्रामपूर येथे दावा दाखल करून गट नंबर दोन व तीन च्या शेतकऱ्यावर कलम १४३ नुसार कार्यवाही करण्याचा आदेश पारित केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here