Home बीड ४० मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या; बीडच्या नीता अंधारे यांच्याही बदलीची चर्चा

४० मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या; बीडच्या नीता अंधारे यांच्याही बदलीची चर्चा

40
0

आशाताई बच्छाव

IMG_20240208_080608.jpg

४० मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या; बीडच्या नीता अंधारे यांच्याही बदलीची चर्चा

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड दि ०७ जिल्ह्यातील नगरपालिकांपैकी गेवराई नगरपालिकेचे मुख्याधिकारी भोसले आणि अंबाजोगाई नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर गुट्टे यांची बदली करण्यात आली असून बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्याही बदलीची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी नगरविकास विभागाने राज्यातील ४० मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात बीड जिल्ह्यातील गेवराई व अंबाजोगाई नगरपालिकेचे अनुक्रमे भोसले आणि गुट्टे यांची बदली झाली असून भोसलेंना चिपळूण नगरपालिका मुख्याधिकारी तर गुट्टेनां उस्मानाबाद येथे सहआयुक्त जिल्हा प्रशासन अधिकारी गट अ या पदावर पदस्थापना देण्यात आली आहे. तर बीड नगर परिषदेत मुख्याधिकारी पदावर आल्यानंतर नीता अंधारे यांनी जेव्हापासून पदभार स्वीकारला तेव्हापासून आत्तापर्यंत शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत प्रश्न, रस्ते व नाल्यांचे प्रश्न सातत्याने आहे तसेच पडून आहेत. किंबहुना त्यात वाढ झाली आहे परंतु मुख्याधिकारी म्हणून हे सर्व प्रश्न सोडविण्यात नीता अंधारे ह्या अपयशी ठरल्या आहेत. शिवाय मुख्याधिकाऱ्यांच्या बनावट सह्या व शिक्का तयार करून पालिकेच्या नावाने बनावट गुंठेवारी करून कागदपत्र बनवणारे रॅकेट उघड होऊनही त्यांनी कसलीच कारवाई केली नाही. याशिवाय २२ वर्षापासून कर्तव्यावर असलेले १३५ स्वच्छता कर्मचारी सुद्धा त्यांनी कामावरुन कमी करून टाकले. सर्व बाबी त्यांच्या विरोधात जात असल्याने लवकरच त्यांचीही बदली होईल अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.

Previous articleक्रांतिकारी संत सेवालाल महाराज जयंती प्रत्येक तांड्यामध्ये जल्लोषात साजरी करा – यश राठोड
Next articleमोबाईल उपयोगी पण….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here