Home विदर्भ भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गडचिरोली इंधिरा गांधी चौकात भावनापूर्ण श्रध्दांजली।

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गडचिरोली इंधिरा गांधी चौकात भावनापूर्ण श्रध्दांजली।

83
0

राजेंद्र पाटील राऊत

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गडचिरोली इंधिरा गांधी चौकात भावनापूर्ण श्रध्दांजली।
गडचिरोली (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): काल गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे सकाळच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपुर्ण देश हळहळलला. काल गडचिरोली शहरातील इंदिरा गांधाी चौकात महाराष्ट्र माझा न्यूज, प्रेरणा मास्क बॅंक व श्री साई बॅंड गडचिरोली यांच्यावतीने भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी प्रथम लता मंगेशकर यांचे ऐ मेरे वतन के लोगोए हे गाणे बॅड पथकाव्दारे वाजविण्यात आले त्यानंतर २ मिनिट मौन पाळून श्रध्दांजली वाहनण्यात आली. समारोप लता दीदींच्या आवाजातील राष्ट्रगीताने करण्यात आला.
यावेळी गडचिरोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस, पोलीस विभागातील इतर कर्मचारी, महाराष्ट्र माझा न्यूजचे संपादक कैलाश शर्मा, The गडविश्व चे संपादक सचिन जिवतोडे, श्रीसाई बॅंड पथकाचे संचालक व पथकातील सर्व सभासद तसेच इतर नागरिक मोठया संख्येन उपस्थित होते.
दरम्यान लता दीदींच्या निधनाने देशभरात दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आले आहे तसेच राज्यसरकारच्या वतीने आज राज्यभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Previous articleछावा प्रतिष्ठान रत्नागिरी कडून नारशिंगे गावातील रस्त्याची डागडुजी
Next articleबायो डिझेलच्या नावाने औद्योगिक इंधनाची विक्री (इंडस्ट्रियल आॅईल) करण्याचा गोरखधंदा पोलिसांनी उघडकीस आणला 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here