Home विदर्भ बायो डिझेलच्या नावाने औद्योगिक इंधनाची विक्री (इंडस्ट्रियल आॅईल) करण्याचा गोरखधंदा पोलिसांनी उघडकीस...

बायो डिझेलच्या नावाने औद्योगिक इंधनाची विक्री (इंडस्ट्रियल आॅईल) करण्याचा गोरखधंदा पोलिसांनी उघडकीस आणला 

171
0

राजेंद्र पाटील राऊत

देवेंद्र कलकोट- वाशीम तालुका प्रतिनिधी
युवा मराठा न्युज

वाशिम : बायो डिझेलच्या नावाने औद्योगिक इंधनाची विक्री (इंडस्ट्रियल आॅईल) करण्याचा गोरखधंदा पोलिसांनी उघडकीस आणला
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४ फेब्रुवारी रोजी वाशिम ते केकतउमरा या मार्गावरील गोटे महाविद्यालयासमोरील एका टिनशेडमध्ये औद्योगिक इंधन, वाहन असा १५.९४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी जिल्ह्याचा पदभार स्विकारल्यापासून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा याकरीता जिल्ह्यात वेळोवेळी नाकाबंदी, कोम्बींगची मोहिम राबवून अवैध्य धंद्यांवर कारवाई, मालमत्तेच्या गुन्हयातील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. बायो डिझेलच्या नावाने औद्योगिक इंधनाची विक्री होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सिंह यांना मिळाल्याने, तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांना खात्री करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, एका टिनशेडमध्ये एमएच२८ बीबी ४९३९ क्रमांकाच्या वाहनातून औदयोगिक इंधन या नावाने बायोडिझेल बेकायदेशीररित्या इलेक्ट्रीक पाण्याची मोटार व पाईप लावुन टिनशेडमधील प्लास्टीक टाकीमध्ये उतरवित असताना आढळून आले. घटनास्थळी नमुद ७ इसमांना पंचासमक्ष ताब्यात घेऊन विचारपुस केली असता, त्यांच्याकडे औदयोगिक इंधन विक्री व साठवणुक करण्याबाबतचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. आरोपींकडुन अंदाजे सहा हजार लिटर औद्योगिक इंधनाचा साठा, एक टाटा वाहन व इतर साहित्य असा एकुण १५ लाख ९४ हजार २५० रुपयाचा मुददेमाल पंचासमक्ष जप्त केला.

पुढील कारवाईसाठी तहसिलदारांना पत्र
औद्योगिक इंधनाचा साठा जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस विभागाने वाशिम तहसिलदार व पुरवठा निरिक्षक यांना लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले.

यांनी बजावली कामगिरी
पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद इंगळे, पोलीस उपनिरीक्षक पठाण यांच्यासह पोलीस कर्मचारी किशोर चिंचोळकर, राजेश गिरी, अमोल इंगोले, प्रशांत राजगुरु, संतोष शेणकुडे यांनी कारवाई केली.

Previous articleभारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गडचिरोली इंधिरा गांधी चौकात भावनापूर्ण श्रध्दांजली।
Next articleमुखेड तालुक्यातील उमरदरी येथील कू. सारिका गायकवाड सेट परीक्षेत उत्तीर्ण.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here