• Home
  • नांदेड येथे, मराठा आरक्षण मिळे पर्यंत सरकारी नौकर भरती रद्द करावी या मागणीसाठी महाआरती आंदोलन करून निवेदन देण्यात आले

नांदेड येथे, मराठा आरक्षण मिळे पर्यंत सरकारी नौकर भरती रद्द करावी या मागणीसाठी महाआरती आंदोलन करून निवेदन देण्यात आले

नांदेड येथे, मराठा आरक्षण मिळे पर्यंत सरकारी नौकर भरती रद्द करावी या मागणीसाठी महाआरती आंदोलन करून निवेदन देण्यात आले

नांदेड, दि. २३ ; राजेश एन भांगे

नांदेड महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ च्या वतीने मराठा आरक्षण मिळे पर्यंत सर्व प्रकारची शासकीय नौकर भरती रद्द करण्यात यावी या मागणीसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर महाआरती करून आंदोलन करण्यात आले व तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. तरी यावेळी प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव, राज्य कोषाध्यक्ष संजय कदम, जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शिवाजी हंबर्डे, राम पाटील कदम, शहराध्यक्ष यशवंत पाटील अवळे, जिल्हा सचिव बळवंत बेडकर, आकाश शिंदे, सचिन स्वामी, बालाजी लांडगे, बाळू गाजभरे, आदी उपस्थित होते तर यावेळी विशेष छायांकन करणसिंग बैस यांनी केले.
तसेच यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव यांनी
कोरोनाच्या काळा मध्ये नोकर भरती करून जाणून बूजून मराठा समाजाची अधोगती करण्याचा प्रयत्न सुरु असून शासनाचे हे षडयंत्र असून मराठा समाज हे कदापीही खपवून घेणार नाही असा इशारा शासनाला दिला.

anews Banner

Leave A Comment