Home Breaking News *‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’* *या मोहीमे जनजागृती करण्याचे* *आवाहन*

*‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’* *या मोहीमे जनजागृती करण्याचे* *आवाहन*

121
0

*‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’*
*या मोहीमे जनजागृती करण्याचे* *आवाहन*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

कोल्हापूर जिल्हातील नगरपालिका क्षेत्रात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेची नगरपालिका क्षेत्रातील सर्व नगरसेवक , सामाजिक संस्था, तरुण मंडळे यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती करा. चौका चौकात डिजटल बोर्ड लावावीत. प्रभागातील घराघरांवर स्टिकर्स लावावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी श्री.दौलत देसाई यांनी आज दिली.
जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी संवाद साधला. जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.दौलत देसाई यांनी नगरपालिका, नगरपंचायती निहाय आढावा घेतला. ते म्हणाले, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेची मोठ्या प्रमाणात जनजागृती करुन प्रभावीपणे सर्व्हेक्षणाचे काम करावे. त्यासाठी नेमलेल्या पथकात मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: किमान अर्धा तास सहभागी व्हावे. इली आणि सारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात शोधून त्यांची स्वॅब तपासणी करावी. हॉटस्पॉटचे सर्व्हेक्षण सुरु ठेवावे. पुन्हा पुन्हा सर्व्हेक्षण करा. एचआरसीटी तपासणी करणाऱ्या लॅबचा ग्रुप करावा. त्यामध्ये तपासणी झालेल्यांचा अहवाल मागवून घ्यावा आणि अशा संशयितांचा पाठपुरावा करुन त्यांची स्वॅब तपासणी करायला लावा.
नगरसेवक, सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्या सहकार्याने होर्डिंग उभे करावेत. घराघरांवर स्टिकर लावावेत. विना मास्क फिरणार नाही, सुरक्षित अंतर राखणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे यावर अधिक भर द्यावा. कारखान्याच्या ठिकाणी नो मास्क नो वर्क असे फलक लावण्यात यावेत, असेही ते म्हणाले.

Previous article*मराठा आंदोलन ट्वेंटी ट्वेंटी ची* *घोषणा* *मराठा क्रांती ठोक मोर्चा*
Next articleनांदेड येथे, मराठा आरक्षण मिळे पर्यंत सरकारी नौकर भरती रद्द करावी या मागणीसाठी महाआरती आंदोलन करून निवेदन देण्यात आले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here