Home बुलढाणा प्रतापरावजी जाधव यांची बुलडाणा जिल्हा शिवेसना संपर्कप्रमुख पदी पुनश्च् निवड जिल्हयातील सर्व...

प्रतापरावजी जाधव यांची बुलडाणा जिल्हा शिवेसना संपर्कप्रमुख पदी पुनश्च् निवड जिल्हयातील सर्व नियुक्त्यांचे अधिकार असणार संपर्कप्रमुखांकडे

56
0

आशाताई बच्छाव

IMG-20220726-WA0001.jpg

प्रतापरावजी जाधव यांची बुलडाणा जिल्हा शिवेसना संपर्कप्रमुख पदी पुनश्च् निवड

जिल्हयातील सर्व नियुक्त्यांचे अधिकार असणार संपर्कप्रमुखांकडे
मुख्यमंत्री.श्री.एकनाथ शिंदे यांचे आदेश

युवा मराठा न्यूज वेब पोर्टल प्रतिनिधी रवि शिरस्कार, संग्रामपूर

.बुलडाणा :-
बुलडाणा जिल्हा शिवेसना संपर्कप्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांची पुनश्च् नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हि नियुक्ती केली आहे. महत्वाचे म्हणजे जिल्हयातील सर्व पदाधिकारी नियुक्तीचे अधिकार संपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांना देण्यात आले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत जिल्हयातील दोन शिवसेना आमदार डॉ.संजय रायमुलकर, संजय गायकवाड हे नविन भाजप सेना सरकार स्थापनेमध्ये सामील झाले. सोबतच दिल्लीत बारा खासदारांनी एकत्र येत शिंदेना समर्थन देत एन.डी.ए. मध्ये सहभागी झाले. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचाही यात समावेश आहे. आपण शिवसेना सोडलेली नाही. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेवुन आपण पुढे जात आहोत. अशि भुमिका खासदार प्रतापराव जाधव यांनी या आधिच जाहीर केली आहे. आज महाराष्ट्र सदन दिल्ली येथे मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडेच बुलडाणा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख पदी पुनश्च् नियुक्ती केली आहे. तसेच जिल्हयातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार त्यांनाच बहाल केले आहेत. याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी सत्कार केला. यावेळी लोकसभेतील गटनेते खा.डॉ.राहुल शेवाळे, खा.हेमंत पाटील, खा.कृपाल तुमाने, खा.धैर्यशिल माने, खा.सदाशिव लोखंडे उपस्थित होते.

Previous articleगावकऱ्यांच्या गावात जाणाऱ्या रस्त्याला अर्धांगवायु
Next articleद्रौपदी मुर्मू देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here