*टिक टाँक सारखी पबजी वर ही बंदी* *घालावी.*
*मोहन शिंदे ब्युरो चिफ युवा मराठा* *न्युज*
सद्या जगाभरात कोरोना महामारीचे संकट तर दुसरीकडे तरूणांना वेड लावणारे पबजी गेम.
तासन तास नव्हे तर दिवस दिवसभर मोबाईल मधे पबजी गेम खेळणारे तरूणांना वेड लागले आहे.
काही तरूणांना या पबजी गेममुळे स्वतः चा जिव गमवावा लागला आहे.
सद्या कोरोना मुळे शाळा , काँलेज बंद असलेने तेरा ते पंचवीस वर्षे वयाच्या मुलांना अक्षरशः पबजी गेमच व्यसनच लागले आहे.
या पबजी मुळे कुस्ती , क्रिकेट ,खो.खो. , कवायत, फुटबाँल या सारखे खेळ मर्दानी खेळ नष्ट होत चालले आहे.
या मर्दानी खेळामुळे तरूणांच्या अंगात जोश , ताकद आणि व्यायाम होत होता पण तो या पबजी मुळे नष्ट होताना दिसत आहे.
सरकारने जशी चिनच्या अँपवरती बंदी घातली तशा प्रकारे या पबजी गेमला या देशातून हद्दपार करून तरूणांच्या जिवावर बेतणारा (वेड लावणारा) खेळ मोबाईलवरील पबजी अँप बंद करायलाच हवे .
सरकारने याकडे जानीवपुर्वक लक्ष घालून पबजीवर कायमची बंदी घालणे गरजेच आहे….
