Home Breaking News *जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची अचानक सीपीआरला भेट*

*जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची अचानक सीपीआरला भेट*

73
0

*जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची अचानक सीपीआरला भेट*

*कोल्हापूर *(*मोहन शिंदे ब्युरो चिफ युवा मराठा न्युज.*)-

*डाँक्टर येतात का..तपासतात का..जेवण कसे आहे.. नाश्त्यामध्ये काय देतात.. काही अडचण आहे का.. समाधानी आहात ना..’*

*कोल्हापूर जिल्ह्याचे साक्षात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज अचानकपणे सीपीआरला भेट देवून थेट कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधून वस्तूस्थिती जाणून घेतली.
वेळ संध्याकाळी सातची.. जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची वाहने नेहमीप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात न जाता अचानकपणे दसरा चौकाकडे वळल्या. अन् काही वेळातच ती वाहने सीपीआर रुग्णालयात दाखल झाली. याठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीष्ठाता डॉ. आरती घोरपडे या व्हीसीमध्ये सहभागी झाल्या होत्या. याठिकाणी त्यांच्याशी चर्चा करुन जिल्हाधिकारी श्री. देसाई आणि महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी डॉ. अनिता सैबन्नावर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील यांच्यासोबत अतिदक्षता विभाग, हिमो डायलेसिस विभाग, ट्रॉमा सेंटर आदींची पाहणी करुन उपचार घेत असणाऱ्या कोरोना रुग्णांशी त्यांनी थेट संवाद साधला.
रुग्णालया मार्फत देण्यात येणाऱ्या सुविधा, उपचार आणि जेवणाचा दर्जा याबाबत सविस्तर माहिती एका पुरुष आणि महिला रुग्णांकडून जाणून घेतली. काही अडचण आहे का? असा थेट प्रश्न विचारुनही त्यांनी जाणून घेतले. यावेळी नाश्त्यासह योग्य आहार पुरवला जात असून डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याची समाधानकारक माहिती रुग्णांनी यावेळी दिली.
याचवेळी रात्र पाळीसाठी येणाऱ्या परिचारिकांशी डॉ. कलशेट्टी यांनी संवाद साधून त्यांना योग्य ती काळजी घेण्याबाबत सांगितले. रुग्णांचा स्वॅब घेतल्यापासून त्यांच्याबाबत पुढील होणाऱ्या कार्यवाहीबाबत आणि यंत्रणेबाबत जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्त यांनी यावेळी प्रत्यक्ष भेटीत जाणून घेतल्या.
डायलेसिस विभागात अतिदक्षता विभाग करण्याबाबत सूचना करुन महात्मा जोतिराव फुले जीवनदायी योजनेत समावेश असणाऱ्या रुग्णालयांपैकी खासगी रुग्णालयात या विभागातील रुग्णांना उपचारासाठी पाठविण्याबाबतची सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केली. कोरोना रुग्णांसाठीची उपचार सुविधा, वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टर्स आणि कर्मचारी यांच्यासाठीची आरोग्य सुविधा यासह मनुष्यबळ वाढविण्याबाबतही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील आणि डॉ. सैबन्नावर यांच्याशी त्यांनी चर्चा केली.
.. .. ..

Previous articleटिक टाँक सारखी पबजी वर ही बंदी* *
Next articleनांदेड प्रतिनिधी – राजेश एन भांगे देगलूर कोविड केअर सेंटर मध्ये रूग्णांची गैरसोय
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here