Home विदर्भ वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालय पुन्हा सलाईनवर

वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालय पुन्हा सलाईनवर

135
0

राजेंद्र पाटील राऊत

वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालय पुन्हा सलाईनवर
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज
एका तासापासून एकही डॉक्टर व कर्मचारी हजर नसल्याने रुग्णाला त्रास

जिल्हा शल्य चिकित्सक यांचा फोन नॉट रीचेबल

डॉ गोमासे यांना रुग्णाने फोन केल्यावर डॉ 45 मिनिटे आलेच नाही* *शेवटी रुग्णाला केले शेगाव रेफर

मागील महिन्यात वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर अभावी गेटसमोर प्रसूती करावी लागली व 5 दिवसांनंतर संग्रामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याने बाजूच्या घरात प्रसूती करावी लागली. हे प्रकरण पत्रकारांनी उचलून धरले व आपल्या संपूर्ण वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित केल्या. लगेच आरोग्य विभागाच्या राज्याचे डायरेक्टर डॉ साधना तायडे, DD डॉ राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे आदी विविध अधिकाऱ्यांनी वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला आणि अधिकारी व कर्मचारी यांची कानउघाडणी केली. परंतु या गंभीर विषयाला एक महिनाही उलटला नाही आणि डॉक्टरांची मनमानी सुरू झाली असून आज 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजेपासून तर 7:45 पर्यंत रुग्णालयात एकही डॉक्टर व कर्मचारी हजर नसल्याने वरवट बकाल येथील एका रुग्णाला शेवटी शेगाव येथे जावे लागले. या रुग्णालयात डॉ गोमासे हे कर्तव्यावर होते. या डॉ साहेबांना रुग्णाच्या नातेवाईकांनी फोन केला असता डॉ साहेब पाऊण तास रुग्णालयात आलेच नाही. अशा कामचोर डॉ गोमासे वर वरीष्ठ अधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकाकडून होत आहे.

Previous articleखरज येथे डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
Next articleशासनकर्ती जमात होण्यासाठी संघटीत होणं हिच खरी बाबासाहेबांना आदरांजली -भारत सोनकांबळे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here