Home बुलढाणा मोताळ्यात विद्यार्थीनींचा शिक्षकाकडून लैंगिक छळ मोताळा तालुक्यात सर्वत्र खळबळ

मोताळ्यात विद्यार्थीनींचा शिक्षकाकडून लैंगिक छळ मोताळा तालुक्यात सर्वत्र खळबळ

40
0

आशाताई बच्छाव

1000277015.jpg

मोताळ्यात विद्यार्थीनींचा शिक्षकाकडून लैंगिक छळ मोताळा तालुक्यात सर्वत्र खळबळ

प्रतिनिधी । मोताळा : युवा मराठा न्युज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर

शिक्षकाला आई-वडिलांपेक्षा मोठा दर्जा दिलेला आहे शिक्षक देशाला काळीमा फासणारी घटना जि प केंद्रीय मराठी शाळेतील इयत्ताचौथ्या वर्गातील दोन अल्पवयीन मुलींना एका शिक्षकाने लैंगिक छळ केल्याची घटना दि. १० एप्रिल रोजी मोताळा परिसरात समोर आली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून शिक्षकाविरोधात बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बोराखेडी पोलिसांत या प्रकरणी एकाने तक्रार दिली आहे. त्याची मुलगी व अन्य एक मुलगी मोताळा परिसरातील एका जि.प.शाळेत चौथ्या वर्गात शिक्षण घेत आहेत. आज सकाळी मुली शाळेत गेल्या होत्या. त्यावेळी शिक्षक दिलीप जाधव हा अल्पवयीन मुलींच्या अंगावरून वाईट उद्देशाने हात फिरवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकाविरोधात बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील, ठाणेदार सारंग नवलकार व सहाय्यक पोलिस निरीक्षक राजवंत आठवले यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजवंत आठवले व

पोलिस कॉन्स्टेबल आकाश यादव करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here