Home बुलढाणा गुढीपाडव्याच्या सणालाही राशनचा गहू तांदूळ मिळेना, राशन दुकानदाराची मशीनही झाली खराब,पुरवठा विभाग...

गुढीपाडव्याच्या सणालाही राशनचा गहू तांदूळ मिळेना, राशन दुकानदाराची मशीनही झाली खराब,पुरवठा विभाग करत तरी काय? लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असतानाही राशनचा काळाबाजार…

23
0

आशाताई बच्छाव

1000277010.jpg

गुढीपाडव्याच्या सणालाही राशनचा गहू तांदूळ मिळेना, राशन दुकानदाराची मशीनही झाली खराब,पुरवठा विभाग करत तरी काय? लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असतानाही राशनचा काळाबाजार…
चिखली( संजय पन्हाळकर युवा मराठा न्युज)चिखली तालुक्यातील मौजे मेरा खुर्द येथे शासनाचे दोन दुकाने आहे परंतु कोणत्याही दुकानदाराने आज रोजी राशनचा माल वितरित केला नाही या गुडी पाडवा हिंदुच्या सणाला सणासुदीला सुद्धा राशनचा माल वाटप केला नाही मेरा खुर्द येथे चार ते पाच दिवसांपूर्वी पुरवठा विभागाने मला पाठवला परंतु डाटा एन्ट्री झाली नसल्यामुळे सदर मला दुकानदारांनी वाटप केला नाही परंतु काल 08/04/ 2024 च्या दिवसी पुरवठा विभागाने डाटा एन्ट्री करून सदर दुकानदारांना मालवितरित करण्याचे online माहिती दिली होती आज पूर्ण जग हे डिजिटल होत असताना राशन दुकान सुद्धा डिजिटल झाले आहे परंतु वितरकांच्या नियोजन शून्य कारभारामुळे दुकानदार यांनी तालुका पुरवठा अधिकारी यांचा मेसेज पाहीलाच नाही त्यामुळे सणासुदीला राशनच्या मालाचे वाटप मेरा खुर्द आणि परिसरामध्ये झालेच नाही काही दुकानदारांनी तर मेसेजच पाहिला नाही असे सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे मेरा खुर्द मध्ये सर्व समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहे या गावांमध्ये मुस्लिम समाज, मागासवर्गीय समाज ,माळी, मराठा ,समाज व इतर समाज हे गुन्या गोविंदाने राहत आहे या आज हिंदू समाजाचा गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब महात्मा ज्योतिराव फुले जयंती तसेच मुस्लिम ईद हा महत्त्वाचे सण याच दिवसांमध्ये होऊ घातले आहेत त्यांचे सुद्धा गोडधोड व्हावे म्हणून शासनाने 08/04/ 2024 लाच डाटा एन्ट्री करून दिली परंतु वितरकांच्या नियोजन शून्य कारभारामुळे लाभार्थ्यांना माल मिळालाच नाही मेरा खुर्द चे राशन दुकानदार यांच्याशी संपर्क साधला असता माझी मशिन खराब झाली आहे त्यामुळे मला माहिती मिळाली नाही तालुका पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता मागील तीन महिन्याचे साखर बाकी आहे त्यामुळे माल वितरित केला नाही असे असमाधान कारक उत्तर दिले तीन महिन्याचा माल ऑनलाईनच्या जमान्यामध्ये कसा बाकी राहिला हे सुद्धा चर्चेचा विषय होऊ शकतो आणि सणासुदीला पुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे लाभार्थ्यांना माल मिळू शकला नाही हे या ठिकाणी विशेष आहे…

Previous articleअंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा वावर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Next articleमोताळ्यात विद्यार्थीनींचा शिक्षकाकडून लैंगिक छळ मोताळा तालुक्यात सर्वत्र खळबळ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here