Home बीड अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा वावर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा वावर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

39
0

आशाताई बच्छाव

1000277008.jpg

अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा वावर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/अंबाजोगाई दि: ११  अंबाजोगाई शहरापासून जवळच असलेल्या पठाण मांडवा, साकुड या ग्रामीण भागात बिबट्याचे दर्शन झाले असून रस्त्याच्या कडेला काही ग्रामस्थांना प्रत्यक्ष बिबट्या दिसून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसापासून बीड जिल्ह्यातल्या विविध भागात बिबट्या दिसून आल्याच्या चर्चा होत होत्या अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा, साकुड हे डोंगराळ व घनदाट जंगलाचा भाग आहे. या रस्त्यावर चारचाकी वाहनातून प्रवास करत असताना रस्त्याच्या कडेला बिबट्याचे दर्शन झाले. तसेच या बिबट्याचे छायाचित्र हाती लागल्याने बिबट्याच्या वास्तव्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. दरम्यान याच भागात अर्धवट खाल्लेले प्राणी व त्यांचे अवशेष आढळून आले असून बिबट्यानेच त्यांचा पडशा पाडला असल्याची दाट शक्यता आहे. या परिसरातील ग्रामस्थांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी शेतात रात्रीच्यावेळी जाते वेळेस एकट्याने जाऊ नये सोबत उजेडासाठी बॅटरी व संरक्षणासाठी काठी हातात असावी. बिबट्याला जेरबंद करेपर्यंत नागरिकांनी या भागातून प्रवास टाळावा असे आव्हान वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here