Home नांदेड देगलूर नगर परिषदेने वाढवलेले मालमत्ता कर व नळपट्टी कर तात्काळ रद्द करा...

देगलूर नगर परिषदेने वाढवलेले मालमत्ता कर व नळपट्टी कर तात्काळ रद्द करा -शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांचा प्रशासनाला इशारा.

219
0

आशाताई बच्छाव

IMG_20231205_175557.jpg

देगलूर नगर परिषदेने वाढवलेले मालमत्ता कर व नळपट्टी कर तात्काळ रद्द करा -शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांचा प्रशासनाला इशारा.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

नांदेड जिल्हातील कुठल्याही महानगरपालिकेने,नगरपरिषदेने, नगर पंचायतने, कुठल्याही पद्धतीने मालमत्ता कर व नळपट्टी कर वाढविले नसताना देगलूर नगर परिषदेला असे जास्तीचे दर वाढविण्या अधिकार कोणी दिला कोविड काळापासून जन सामान्यांचे जन जिवन विस्कळीत झाले असून, देगलूर नगरपरिषदेने हा जुलमी ठराव का घेतला, एका दृष्टीकोनातून विचार केला तर दर दहा वर्षांनी मालमत्ता कर व पाणी पुरवठा कर हे दिड टक्क्यांनी वाढविले जातात पण हे काही भरमसाठ पध्दतीने कर वाढवुन देगलूरच्या सुजाण नागरिकांनी याचा फटका का सहन करायचा या जुलमी मालमत्ता कर व पाणी पुरवठा कर दर वाढिचा आम्ही निषेध करतो, एक तर पाणी दोन तिन दिवसा आड पाणी पुरवठा होत असुन 365 दिवसांची पाणी पुरवठा कर आकारली जाते पाणी पुरवठा तर हा 250 दिवसा पेक्षा कमी दिवस पण नळपट्टी कर मात्र 365 दिवस हा कोणता नियम देगलूर नगर परिषदेने घेतला याचा जाब जनतेला दिला पाहिजे,देगलूर नगरपरिषदेने तात्काळ वाढविले मालमत्ता कर व पाणी पुरवठा कर तात्काळ रद्द करावं अन्यथा देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांच्या वतीने देगलूर नगर परिषदेच्या समोर साखळी उपोषण करण्याचा इशारा देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांनी दिला या मागणीचे निवेदन देगलूर नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी देतेवेळी शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांच्या वतीने निवेदन देतेवेळी परिट समाचे दिगंबर दाऊबे, शिवसेनेचे न्याळु पवार, कॉंग्रेस पक्षांचे शोएब पटेल शहापुरकर, भाजपाचे योगेश मैलागिरे, भाजपा उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष हरिष सेठ अग्रवाल,गबरु नागशेट्टीवार , बालाजी दादा मैलागिरे ॲड अवधूत राजकुंटवार,बालाजी रेनगुंटवार, हनुमंत देगावकर यांच्या समवेत अनेक जणं उपस्थित होते..

Previous articleअवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या :- वंचित बहुजन आघाडी
Next articleकृषी कन्या नी बनवले गांडूळ खत.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here