Home भंडारा अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या :-...

अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या :- वंचित बहुजन आघाडी

34
0

आशाताई बच्छाव

IMG_20231205_175259.jpg

अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या :- वंचित बहुजन आघाडी

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) जिल्हयातील बहुतांश शेतकरी धानाचे उत्पादन जास्त प्रमाणात घेत असून शेतकरी कुटूंबाची उपजिविका धानाच्या शेतीवर अवलंबुन आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुरुवातीपासून धानावर खोड किडा, बुरशीजन्य रोग आणि विषाणूजन्य रोगामुळे नुकसान झाले, त्या परिस्थितीला सारुन शेतकरी धान कापणी, धान मळणी करीत असतांना अचानक ढगाळ वातावरणानंतर जिल्हयात २८ नोव्हेंबर २०२३ रोजी पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच दानादाण झाली. कापणी केलेले धान पिक पाण्यात सापडले. त्याच प्रमाणे बांध्यात पाणी साचलेले असल्यामुळे धानाची कापणी करता येत नाही, मळणीचे काम लांबणीवर गेले. यामुळे धान पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली, पाण्यात सापडलेल्या धानाला अंकुर फुटल्यासारखे झाले, हे सदृश्य संकट शेतकऱ्यांवर आलेले आहे.
त्यामुळे अवकाळी आलेल्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी जिल्हा भंडारा च्या वतीने करण्यात येत आहे, अंकित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आली आहे निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले, जिल्हा संघटक डी जी रंगारी, माजी सभापती व सल्लागार चरणदास मेश्राम,मार्गदर्शक तुळशीराम गेडाम, मनोज खोब्रागडे, ताराचंद नंदागवळी, तोताराम मेश्राम, ग्यांनचंद जांभूळकर, सदानंद रंगारी, मेघराज अंबादे, सी डी गवरे, नितीन गजभिये, अनिल मेश्राम, आर के रामटेके अमित नागदेवे, महिला जिल्हाअढेक्स तनुजा नागदेवे, व संविधान बचाव संघर्ष समिती चे रोशन जांभूळकर, अचल मेश्राम, ग्यानचंद जांभूळकर कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यांनी पाठिंबा दिला कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.

Previous articleकला पुरस्काराकरिता प्रबोधनकार तनुजा नागदेवे यांची निवड
Next articleदेगलूर नगर परिषदेने वाढवलेले मालमत्ता कर व नळपट्टी कर तात्काळ रद्द करा -शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांचा प्रशासनाला इशारा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here