Home विदर्भ जि.प.,पं.स. पोटनिवडणूक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा

जि.प.,पं.स. पोटनिवडणूक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा

81
0

राजेंद्र पाटील राऊत

जि.प.,पं.स. पोटनिवडणूक

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा

अकोला: (सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-  जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात आयोजित या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार आदी उपस्थित होते.

यावेळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे १४ निवडणूक विभाग व पंचायत समितीचे २८ निर्वाचन गणात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत १ लाख ७७ हजार ७०० स्त्री, १ लाख ९४ हजार १९ पुरुष तर एक इतर असे एकुण ३ लाख ७१ हजार ७२० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी तेल्हारा तालुक्यात ७७, अकोट ८१, मुर्तिजापुर ८३, अकोला ८५, बाळापूर ७४, बार्शी टाकळी ४९, पातुर ३९ असे एकुण ४८८ मतदान केंद्र असतील. तालुकानिहाय नियोजन करुन जिल्ह्यात ४४ क्षेत्रिय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी ६०७ केंद्राध्यक्ष व १८२१ मतदान अधिकारी असे २४२८ जणांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचेही नियोजन करण्यात आले असून दि.२४ ते दि.३० या दरम्यान तालुकास्तरावर हे प्रशिक्षण होईल.

या निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे.

यावेळी तालुकास्तरावर मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करणे, ईव्हीएम बद्दल जनजागृती करणे, उमेदवारांच्या खर्चाचा तपशिल गोळा करणे याबाबत उपस्थितांना सुचना देण्यात आल्या. जिल्हा परिषद निवडणुक विभागासाठी एका उमेदवाराची खर्च मर्यादा चार लक्ष तर पंचायत समिती निर्वाचक गणासाठी एका उमेदवाराची खर्च मर्यादा तीन लक्ष रुपये इतकी असल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुक विभागासाठी (१४) ९५ उमेदवार तर पंचायत समिती गणासाठी(२८) १६१ नामनिर्देशित उमेदवार आहेत.

निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक राबवावी. आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

Previous articleराष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त व्यापक मोहिम मंगळवारी (दि.२१) तीन लाख ६५ हजार बालकांना देणार जंतनाशक गोळ्या
Next articleचालक दिना निमित्त वाहतूक नियमाचे मार्गदर्शन करून चालकांचे पुष्प देऊन गौरव
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here