Home गडचिरोली कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी प्रतिभाताईंचा आदर्श घ्यावा आमदार डॉ देवराव जी...

कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी प्रतिभाताईंचा आदर्श घ्यावा आमदार डॉ देवराव जी होळी

33
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220510-WA0016.jpg

कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी प्रतिभाताईंचा आदर्श घ्यावा

आमदार डॉ देवराव जी होळी                                                   गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

जिजामाता कृषिभूषण पुरस्कार प्राप्त प्रतिभाताई चौधरी यांचा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केला सत्कार

२ मे २०२२ रोजी नाशिक येथे राज्यपाल उपमुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन करण्यात आला गौरव

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे च्या वतीने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केला शाल व श्रीफळ देऊन सत्कार

दिनांक १० मे गडचिरोली

नवेगाव येथील प्रगतशील महिला शेतकरी तथा भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी यांना जिजामाता कृषीभूषण पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाकडून गौरवण्यात आले. कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी प्रतिभाताईंचा खरोखर आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला .
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती विलासजी दशमुखे नवेगावचे सरपंच राजूभाऊ खंगार ,तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे भाजपा कार्यकर्ते किर्ती मासुरकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

प्रतिभाताई चौधरी यांनी आपल्या शेतीला प्रगतशील केले असून जिल्ह्यातील ईतर महिलांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे त्यांचे काम आहे. कृषी क्षेत्रामध्ये आता महिला मागे नाहीत हेही त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने दाखवून दिले आहे. मुंबई येथे प्रवासात असल्याने त्यांचा नियोजित वेळी सत्कार करता आला नाही त्याची खंत आहे. परंतु त्यांचे अभिनंदन आपण यापूर्वी केलेले आहे. आज त्यांचा सत्कार करताना आम्हालाही अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी त्यांच्या सत्कार प्रसंगी केले.

Previous articleचामोर्शीचा पशुधन विकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात। दहा हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक।
Next articleसंत नगरीत रेल्वे निरीक्षण समिती भुसावळ, मार्फत शेगाव रेल्वेस्थानकाची  पाहणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here