Home बुलढाणा संत नगरीत रेल्वे निरीक्षण समिती भुसावळ, मार्फत शेगाव रेल्वेस्थानकाची  पाहणी

संत नगरीत रेल्वे निरीक्षण समिती भुसावळ, मार्फत शेगाव रेल्वेस्थानकाची  पाहणी

56
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220510-WA0007.jpg

संत नगरीत रेल्वे निरीक्षण समिती भुसावळ, मार्फत शेगाव रेल्वेस्थानकाची  पाहणी

आमदार ऍड. आकाशजी फुंडकर यांनी केले शेगांवकर रेल्वे समिती पदाधिकाऱ्यांचे स्वागत आणि सत्कार                          संग्रामपूर,(रविंद्र शिरस्कार शहर प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

शेगाव मध्य रेल्वे स्थानक, शेगाव येथे आज रेल्वे प्रबंधक मंडळ,भुसावळ कार्यालय मार्फत शेगाव येथे रेल्वे सल्लागार समिती पुनर्गठीत करण्यात आली असून त्यामध्ये शेगाव येथील गोपाल गीते, राजेश अग्रवाल, ऍड. पुरुषोत्तम डांगरा, सौ. मिनाक्षी बुरुंगले,संजय त्रिवेदी, राजु सुरवाडे, फईम देशमुख, डॉ. प्रदीप गायकवाड, प्रदीप गरमटे,मुकिंदा खेळकर, असे एकुण 10 सदस्य यांच्या उपस्थित सह आमदार ऍड.आकाश फुंडकर खामगाव यांनी आलेल्या रेल्वे निरीक्षण समितीला भेट दिली तसेच पुनर्गठीत स्थानिक शेगाव रेल्वे सल्लागार समिती सदस्यांचे आज स्वागत आणि सत्कार केला
सदर रेल्वे मंडळ भुसावळ मार्फत भुसावळ मंडळाच्या वतीने एकूण 14 स्टेशन वर दि.01/01/2022 ते 31/12/2023 या 2 वर्षाच्या कालावधीत मध्य रेल्वे भुसावळ मार्फत स्थानिक रेल्वे सल्लागार पुनर्वसन मोहीम राबवून त्यामध्ये नाशिक रोड, मनमाड,नांदगाव, चाळीसगाव,धुळे,पाचोरा,जळगाव,भुसावळ,मलकापूर,नांदुरा,शेगाव,अकोला,बडनेरा,अमरावती,
खंडवा या रेल्वे स्थानकांच्या समावेश आहे
संतनगरीचा दर्जा प्राप्त शेगाव येथे दररोज हजारो भाविक श्रींच्या दर्शनासाठी रेल्वे प्रवासात येत असतात मध्य रेल्वे शेंगाव रेल्वे स्थानक कधीही भरगच्च राहते त्यामुळे आमच्या शेंगाव रेल्वे स्थानक वर स्वच्छता राहली पाहिजे , त्यामध्ये पिण्याच्या पाणी सुव्यवस्था, तसेच रेल्वे मध्ये आत महिला प्रवाश्यांना सरंक्षण, आतील व्यवस्था,इतर अनेक उपाय योजना अश्या अनेक विषयांवर आज आमदार ऍड. फुंडकर यांनी स्थानिक समिती शेगाव यांच्या उपस्थितीत आलेल्या भुसावळ मंडळ समिती सोबत आज चर्चा केली

Previous articleकृषि क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी प्रतिभाताईंचा आदर्श घ्यावा आमदार डॉ देवराव जी होळी
Next articleजळगाव जामोद येथे महाराणा प्रताप जयंती थाटा माटात आमदार डॉ. संजय कुटे यांनी चौकात गजरासह ओवाळली आरती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here