Home जालना जालन्यात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

जालन्यात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

25
0

आशाताई बच्छाव

1000276564.jpg

जालन्यात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
आ. कैलास गोरंट्याल यांना महात्मा ज्योतीबा फुले सन्मान गौरव पुरस्कार प्रदान
जालना/प्रतिनिधी दिलीप बोंडे 
क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त 11 एप्रिल 2024, बुधवार रोजी जालना शहरातील जालना शहर महापालिका कार्यालयासमोरील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.  यावेळी “जय ज्योती” “जय क्रांती” च्या जय घोषाने परिसर दुमदुमून गेला.
यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, मॉ. सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब वानखेडे,  समितीचे अध्यक्ष सुरेश रत्नपारखे,काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमुद, प्रा. सत्संग मुंढे, राजेंद्र राख, नंदाताई पवार, एकनाथराव गायकवाड, सुरेश रत्नपारखे, सुरेश खरात,  गणेश जाधव, महेंद्र शिंगणे, इब्राहिम शेख, गणेश वाघमारे, दिलीप पाऊलबुध्दे, गंगुबाई वानखेडे, मंगलाताई खांडेभराड, शितल तनपुरे, श्रीमती डांगे, रमेश मुळे,  डॉ. विशाल धानुरे, दशरथ तोंडुळे, मुन्ना भोसले, राम सावंत, शिवप्रकाश चितळकर, दिनकर घेवंदे, धरम इंगळे, नितीन तावडे,  ॲड. अर्शद बागवान ॲड. रामेश्‍वर खांडेकर, देवकर, सावता तिडके, सचिन वानखेडे, कडुबा वाकीकर  आदिंची उपस्थिती होती.
यावेळी आ.कैलास गोरंट्याल यांनी गांधी चमन येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौकाजवळ एक सभागृह आचारसंहिता संपल्यानंतर बांधून देणार असल्याची वचन दिले.
जालना शहरात थेट जायकवाडीतून पाणी आणून  शहरवासियांचा पाणी प्रश्‍न सोडविल्याबद्दल व शहरात मेडीकल कॉलेज मंजुर करून आणल्याबद्दल आ. कैलास गोरंट्याल यांना महात्मा ज्योतीबा फुले सन्मान गौरव पुरस्कार  संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब वानखेडे, समितीचे अध्यक्ष सुरेश रत्नपारखे यांनी प्रदान केला. तसेच जालना शहर महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर,  सुधाकर निकाळजे

Previous articleसोमपूरचा मटकाकिंग दाणी, कमावतो हरामाचा मालपाणी!
Next articleअंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा वावर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here