Home अमरावती नवनीत रानाच्या वक्तव्याने विरोधकांच्या हाती कोलती; कडूंचाही भाजपला सवाल.

नवनीत रानाच्या वक्तव्याने विरोधकांच्या हाती कोलती; कडूंचाही भाजपला सवाल.

170
0

आशाताई बच्छाव

1000277060.jpg

नवनीत रानाच्या वक्तव्याने विरोधकांच्या हाती कोलती; कडूंचाही भाजपला सवाल.
__________
दैनिक युवा मराठा.
पीएन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या बाहेरच्या या वक्तव्याने चांगलीच राळ उठवुन दिलीआहे. ते प्रत्युत्तर भाजपलाच टोला टाईपअसल्याने झपाट्याने व्हायरल होत असून विरोधकांच्या हाती मात्र आयते कोलित सापडले आहे. नवनीत राणा या भाजपमध्ये आले आहेत. आज ना उद्या त्या रवी राणा यांना आदेश देतील, ते देखील भाजपमध्ये येतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी म्हटले होते. त्या संदर्भाने पत्रकारांनी नवनीत राणा यांना प्रश्नाची भडीमार केली असता, मी स्वाभिमानाने भाजपात आली. रवी राणा त्यांचा निर्णय घेतील. नवरा बायको बाहेरच्यांनी बोलू नये, अशी प्रतिक्रिया दिली. त्यात प्रतिक्रियाने भाजपमध्ये अनेकांची पंचायत केली आहे. भाजपमध्ये येऊन आठ दिवस झाले नसताना आमचे प्रदेशाध्यक्ष नवनीत राणा यांच्यासाठी बाहेरचे होतात तर तेथे त्यांच्या प्रचारात प्राणप्रणाने झोकुन देणाऱ्याचे काय, असा सवाल काही भाजपचे आहे. या उलट नवनीत राणा यांचे बावनकुळे यांना बाहेरचे हे विशेष विरोधकांना मुद्दा देऊन गेले आहे. त्यावर बावनकुळे मी देखील प्रतिक्रिया दिली आहे
ती रिलीज करायला सांगते असे भाजपच्या अमरावती लोकसभा प्रमुख निवेदिता चौधरी यांनी म्हटले आहे. नवनीत राणा या बावनकुळेच्या नवे तर इतरांनी जे भाष्य केले त्यावर व्यक्त झाल्या. बावनकुळे बाबत त्या अशा बोलू शकत नाही. अपमान केला, असे मला अजिबात वाटत नाही. आमच्या टीम मध्ये गोंधळ नाही. काय कुलकर्णी, प्रवक्ते प्रदेश भाजपा नवनीत राणांचा जो जुना स्वभाव आहे. गरज सरो अन वैद्य मरो, अशी त्यांची प्रवृत्ती आहे. यशोमती ठाकूर काँग्रेसच्या आमदार तिवसा आताच जर त्या बावनकुळेंना बाहेरचे म्हणत असतील तर भाजपचे आमदार, नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी तर केव्हाच बाहेर चे झाले आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी चिंतन मनन करण्याची गरज आहे. असे बच्चू कडू प्रहार चे आमदार अचलपूर यांनी म्हटले आहे

Previous articleमोताळ्यात विद्यार्थीनींचा शिक्षकाकडून लैंगिक छळ मोताळा तालुक्यात सर्वत्र खळबळ
Next articleसिंदखेडराजा येथील “खादाड” तहसीलदार बुलढाणा एसीबीच्या जाळ्यात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here