राजेंद्र पाटील राऊत
खरज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन..
—————————————-
औरंगाबाद: ब्युरो चीफ-बबन निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
—————————————-
वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरज येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला.
सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.खाडे सर ,यांनी केले.नंतर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्र उलगडण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या मनोगतानंतर जेष्ठ शिक्षक श्री प्रकाश भगत सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर सखोलपणे विस्तृत प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना भावनिक केले.
यावेळी मुख्याध्यापक श्री.खाडे सर श्री प्रकाश भगत सर सौ चवरे मॅडम आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रकाश भगत सर यांनी तर आभार सौ. चवरे मॅडम यांनी केले.