Home मराठवाडा न्यु हायस्कूल तलवाडा येथे डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित विनम्र अभिवादन

न्यु हायस्कूल तलवाडा येथे डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित विनम्र अभिवादन

222
0

राजेंद्र पाटील राऊत

न्यू हायस्कूल तलवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..

—————————————-
औरंगाबाद: ब्युरो चीफ-बबन निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
—————————————-
वैजापूर तालुक्यातील न्यू हायस्कूल तलवाडा येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला.
सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक संजय खरात यांनी केले.नंतर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्र उलगडण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या मनोगतानंतर जेष्ठ शिक्षक के.एस.नाडगौडा, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
नरेंद्र पोटे यांनी सविस्तर माहिती दिली.गंगाधर तोटेवाड यांनी प्रास्ताविक भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर सखोलपणे विस्तृत प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना भावनिक केले.
यावेळी मुख्याध्यापक संजय खरात,के.एस.नाडगौडा,गंगाधर तोटेवाड, तुषार शिरसाठ, सुरेश गायकवाड, बाळासाहेब लिमकर, जयप्रकाश पवार, नरेंद्र पोटे, राजेंद्र जोर्वेकर, बबनराव निकम, हसन सय्यद, शंकर चव्हाण आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर तोटेवाड यांनी तर आभार प्रदर्शन नरेंद्र पोटे यांनी केले.

Previous articleप्राणहिता पुष्कर मेळाव्या निमित्त गडचिरोली प्रशासनाकडुन नियोजनाला सुरुवात।
Next articleखरज येथे डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here