Home विदर्भ प्राणहिता पुष्कर मेळाव्या निमित्त गडचिरोली प्रशासनाकडुन नियोजनाला सुरुवात।

प्राणहिता पुष्कर मेळाव्या निमित्त गडचिरोली प्रशासनाकडुन नियोजनाला सुरुवात।

115
0

राजेंद्र पाटील राऊत

प्राणहिता पुष्कर मेळाव्या निमित्त गडचिरोली प्रशासनाकडुन नियोजनाला सुरुवात।
गडचिरोली:(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) तेलंगना महाराष्ट्र सिमेवर सिंरोचा येथे दर 12 वर्षानी होणार्या प्राणहिता पुष्कर याञेबाबत जिल्हा प्रशासनाकडुन नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे.कोरोणा संसर्गाच्या परिस्थित जर मेळ्याव्याचे आयोजण झालेच तर प्रशासनाकडुन सर्व आवश्यक उपायोजना वेळेत उभ्या राहाव्यात या हेतूने जिल्हाअधिकारी संजय मीणा यांनी संबधित विभागाची बैठक घेतली.पुष्कर मेळावा हा दि.13 ते 24 एप्रिल 2022 दरम्यान कालेश्वरम तेलंगणा सिरोंचा या भागात आयोजीत होणार आहे.त्या द्रष्टिने येणार्या लाखो भाविकांची व्यवस्था करणे तसेच अंनुषगिक व्यवस्था करण्यासाठी काय काय करावे लागेल याबाबत सवेक्षण व नियोजणाचे आदेश त्यांनी प्रशासनातील विविध भागाना दिले.यावेळी बैठकिला मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद,अति.पोलिस अधिक्षक समिर शेख,उपजिल्हा अधिकारी धनाजी पाटिल,सबंधित तालुका स्तरावरुन उपविभागीय दंडाधिकारी , तहसिलदार, मुख्यअधिकारी तसेच पोलिस अधिकारी उपस्थित होते.
जर मेळ्याव्याचे आयोजण झालेच तर भाविकांनसाठी लागणारी नदि घाटावरील जागा तयार करणे,स्वच्छता ग्रह तयार करणे, पाण्याची वैवस्था ,लाईट ची व्यवस्था तसेच इतर आवश्यक नियोजनासाठी लागणारी मदत याबाबत तयारी करण्याच्या सुचना जिल्हाअधिकारी संजय मीणा यांनी दिल्या.तसेच तेलंगना प्रशासनाशी समंन्वय साधुण नियोजण करणे , मंदिर व्यवस्थांपकांशी संवाध साधुन भांविकांचा येण्या जाण्याचा मार्ग निश्चित करणे याबाबतही नियोजण केले जाणार आहे.या पुवी सन 2010 साली झालेल्या पुष्कर मेळाव्यात तेलंगणातून महाराष्ट्रत येणार्यांसाठी सिरोंचा येथे पुल नव्हता.आता येण्याजाण्यासाठी पुलाची व्यवस्था असल्याणे सिरोंचा कडे जास्त भांविक येण्याची शक्यता आहे.साधारण 5 लक्ष भाविंकाच्या हिशोबाणे सदर मेळाव्याचे आयोजन होवु शकते असा अंदाज व्यवस्थेसाठी ग्रहित धरण्यात आला आहे.

Previous articleचिकटगांव परिसरातील पत्रकारांचा आदर सत्कार समारंभ नुकताच पार पडला.
Next articleन्यु हायस्कूल तलवाडा येथे डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित विनम्र अभिवादन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here