• Home
  • पालघर जिल्हारुग्णायमध्ये मोफत डायलिसिस सेवा उपलब्ध

पालघर जिल्हारुग्णायमध्ये मोफत डायलिसिस सेवा उपलब्ध

 

पालघर ता. ३१ वैभव पाटील: सामाजिक दायित्व उपक्रम अंतर्गत आयसीआयसीआय ग्रुपच्या आयसीआयसीआय फाउंडेशनतर्फे महाराष्ट्रातील पालघर, औरंगाबाद, भंडारा, चंद्रपूर, धुळे आणि नांदेड या ६ जिल्ह्यात मोफत डायलिसिस मशीन उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. जिल्ह्यातील स्थानिक जिल्हा रुग्णालयांमध्ये सेवा पायाभूत सुविधा आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध जिल्हा रुग्णालयांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशन चे अध्यक्ष सौरभ सिंग यांनी दिली.

याबाबत बोलताना सौरभ सिंग पुढे म्हणाले की, सर्वसामान्यांसाठी उत्तम आरोग्यसेवा मिळवण्याच्या दिशेने एक पाऊल उचलून आम्ही विविध रूग्णालयात 100 हून अधिक डायलिसिस मशीन उपलब्ध करुन देत आहोत. अशाप्रकारे, देशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील रुग्णांना त्यांच्या घराजवळ डायलिसिसची सुविधा उपलब्ध होईल. आमचा विश्वास आहे की या उपक्रमामुळे रुग्णांचा वेळ आणि खर्च वाचेल, कारण त्यांना यापुढे डायलिसिससाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागणार नाही. ”

विशेष म्हणजे आयसीआयसीआय फाऊंडेशन ही अत्याधुनिक आयात केलेली मशीन्स खरेदी करीत आहे आणि निवडलेल्या रुग्णालयांमध्ये ती बसवण्याच्या प्रक्रियेत आहे. डायलिसिस सेंटरमध्ये अखंडित ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी ही मशीन चार वर्षांच्या वॉरंटीसह स्थापित केली जात आहेत

anews Banner

Leave A Comment