*शेतीच्या बांधांवर जाऊन आमदारांनी केली पाहणी.*
हातकणंगले तालुक्यातील सावर्डे, लाटवडे परिसरात मान्सून पूर्व गारांसह वादळी अतिवृष्टी झालेमुळे उसाची शेती, घरे, कोंबड्या शेड, व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. हातकणंगले तालुक्याचे विद्यमान *आमदार राजूबाबा आवळे* साहेबानी समंधित शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी केली. व जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी अशा सूचना शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी सर्कल गर्जे साहेब , तलाठी, तालुका कृषी अधिकारी गोरेसाहेब , कृषी तज्ज्ञ साहेब, तसेच उपाध्यक्ष बबन दादा पाटील, अमर पाटील, चेतन चव्हाण, सरपंच, सदस्य इतर मान्यवर, भागातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आमदार साहेबांच्या प्रत्यक्ष भेटी मुळे सावर्डे लाटवडे भागात समाधान व्यक्त केले जात आहे.
*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज कोल्हापूर*
