• Home
  • लग्न पत्रिकेसाठी केला जातोय डिजिटल पत्रिकांचा आधार.

लग्न पत्रिकेसाठी केला जातोय डिजिटल पत्रिकांचा आधार.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210401-WA0016.jpg

लग्न पत्रिकेसाठी केला जातोय डिजिटल पत्रिकांचा आधार…!वाखारी,दि.१=(प्रतिनिधी दादाजी हिरे युवा मराठा न्युज नेटवर्क)-डिजिटल मोबाईलचे युग सुरु आहे,आज प्रत्येकाकडे अँन्डाँईड मोबाईल पहायला मिळतो, लाँकडाऊन मध्ये तर मोबाईल हेच सर्वाचे जवळचे साधन बनले होते.
भेटीगाटी बंद झाल्याने फोन एकच आधार बनला होता. तर विविध कंपन्या,मंडळी संस्थानी मोबाईलच्या माध्यमातुन सभा घेतल्या नंतर मागील जुनपासुन शालेय शिक्षण आँनलाईन मोबाईलद्वारे अद्याप देखील सुरु आहे. ऐवढेच नव्हे तर लग्नाच्या पत्रीकांचे वाटप आता प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन केले जात नसुन डिजीटल पध्दतीने निमंत्रन देण्यात येत आहे. त्यामुळे डिजीटलच्या युगात डिजीटल आमंत्रन दिले जात असुन या आमंत्रणाचा सर्वाकडुन स्विकारही केला जात आसल्याचे चित्र कोरोना काळात दिसुन येत आहे. गेल्या आठ महीण्यापासुन देशावर आलेल्या कोरोनाचे संकट घोंगावंत असल्यामुळे प्रशासनाकडुन खबरदारी म्हणुन निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामध्ये अनेकांचे लग्न मुर्हुत हुकले होते. परंतु प्रशासनाकडुन विवाह सोहळ्यासाठी मोजक्याच लोकाची परवानगी देण्यात आली आसल्याने सद्या सर्वत्र साध्या पध्दतीने लग्नघाई उरकुन घेतली जात आहे. ना घोडा ना वराती अगदी कमी आणि मोजक्या लोकाच्या उपस्थीतीत लग्नपार पाडले जात आहेत.तब्बल पाच ते सहा महीने कोणतेही कार्यक्रम सार्वजनिकपणे साजरे करता आले नाही. यानंतर हळुहळु जनजीवन पुर्वपदावर येऊ लागले आणी शासनाने काही मोजक्या लोकाच्या उपस्थीतीत कोरोना संदर्भात घ्यावयाच्या काळजीच्या अधिन राहुन शिथीलता आणली त्यामुळे काढलेले लग्नाचे मुर्हुत आता नव्याने काढुन लग्नास सुरुवात झाली आहे. परंतु पुन्हा एकदा कोरोनाचे थैमान सुरु झाल्याने परिस्थीती गंभिर होत चालली आहे.त्यामुळे व्हाँटसअँपवर लग्नपत्रीका पाठवुन डिजीटल पध्दतीने सर्वाना आमंत्रण दिले जात आहे. व या डिजीटल आमंत्रणावर डिजीटल शुभेच्छा देखील दिलेल्या पहावयास मिळत आहे.

anews Banner

Leave A Comment