• Home
  • अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याचा संजय राऊतांनी घेतला समाचार, म्हणाले, “भल्या पहाटे उठून…” 🛑

अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याचा संजय राऊतांनी घेतला समाचार, म्हणाले, “भल्या पहाटे उठून…” 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210401-WA0013.jpg

✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीच्या चर्चेचा आज सामनातून समाचार घेण्यात आला आहे.

फडणवीसांचे राज्य महाराष्ट्रात असताना साम-दाम-दंड-भेद वापरून सत्ता टिकवण्याची भाषा केली जात होती. हा साम-दाम-दंड-भेद इतरांच्या हातीही असू शकतो. तेव्हा अहमदाबादच्या गुप्त बैठकीची अफवा पसरवून गोंधळ घालणे हा त्याच भेद-नीतीचा प्रयोग आहे.

अर्थात, त्यातून काय साध्य होणार? शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर आघात करून महाराष्ट्राचे सरकार कमकुवत करायचे, असे भाजपचे डावपेच आहेत असा आरोप सामना अग्रलेखातून भाजपावर केला आहे. शिवसेनेने भाजपावर टीकेचा बाण चालवताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटा घेतला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल रोखठोक मत मांडल्यानंतर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच, कुणीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये असा सल्लाच संजय राऊत यांना दिला होता.

आजच्या अग्रलेखातून अजित पवारांच्या या वाक्याचा संदर्भ पकडत भाजपवर निशाणा साधला आहे.

”भल्या पहाटे मिठाचा खडा टाकून दूध नासवायचा प्रयत्न एकदा भलेही झाला, मात्र आता तसा काही नासवानासवीचा प्रकार होऊ शकणार नाही.

एक वेळ दुधात पडलेला मिठाचा खडा बाहेर काढता येईल, पण गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे दूर होणे कठीण, असा सध्याचा सिद्धांत आहे.”, अशा शब्दात सामनातून अजित पवारांना कानपिचक्या घेण्यात आल्या आहेत.

दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांचे दाबदबाव व राज्यपालांचे विशेष सहाय्य घेऊनही महाराष्ट्र सरकार जागचे ढिम्म हलायला तयार नाही. त्यामुळे विरोधकांना वैफल्याचा आजार जडला आहे. सध्या शरद पवार थोडे आजारी आहेत.

त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया होत आहे, पण वैफल्य व निराशा यामुळे पित्त खवळले आहे ते भाजपचे. पवार लवकरच बरे होऊन कामास लागतील.

भाजपनेही गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे असा टोला शिवसेनेने भाजपाला आणि केंद्र सरकारला लगावला आहे.⭕

anews Banner

Leave A Comment