Home अमरावती पी.आर.पोटे पाटील कृषी महाविद्यालय अमरावती द्वारा कृषी संजीवनी सप्ताह

पी.आर.पोटे पाटील कृषी महाविद्यालय अमरावती द्वारा कृषी संजीवनी सप्ताह

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20220629-WA0038.jpg

पी.आर.पोटे पाटील कृषी महाविद्यालय अमरावती द्वारा
कृषी संजीवनी सप्ताह

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

अमरावती:- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित पी. आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालय , अमरावती द्वारा संचालित ‘ ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम ‘ सन २०२२ – २३ या कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थी कृषीदुत म्हणून योगेश भारत निखाडे व पूर्वेश गायवाड यांनी नांदगाव पेठ ता.जि. अमरावती येथे ” कृषी संजीवनी सप्ताह ” आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत उपस्थित शेतक-यासमोर शेतकरी महिला सशक्तीकरण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच माती परीक्षण, बियाण्याची उगवणक्षमता, बिज प्रक्रिया, खत बचत याबाबत शेतक-यांना मार्गदर्शन व महिला सशक्तीकरण या विषयावर व्याख्यान झाले. या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून श्री. किशोर हतांगळे ( तालुका कृषी अधिकारी ) , सौ. निता कवाने ( मंडळ कृषी अधिकारी ) , श्री. उमेश टिंगरे ( कृषी पर्यवेक्षक ) , श्री. अनिकेत पुंड ( कृषी सहायक ) , इत्यादी अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित शेतकरी श्री. भगवान बजाज, श्रीमती पद्मा सहकार, सौ ममता रामटेके, कु. पि. पाखाजे , सौ. वनिता मूळे व इतर शेतकरी उपस्थित होते . सदर कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. वैभव लाजुरकर सर , उपप्राचार्य नितेश चौधरी सर , कार्यक्रम समन्वयक प्रा. राहुल कऴसकर सर , प्रा. उदय देशमुख सर , प्रा. हेमंत पवार सर , प्रा. श्वेता देशमुख मॅडम , प्रा. डॉ. अर्चना त्रिपाठी मॅडम , प्रा. अर्चना बेलसरे मॅडम , प्रा. श्रद्धा देशमुख मॅडम , प्रा. श्वेता गणवीर मॅडम व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या कार्यक्रमाला गावातील सरपंच , उपसरपंच व पोलिस पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी सहकार्य केले. पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ॲंड वेलफेअर ट्रस्ट चे अध्यक्ष मा. श्री. प्रवीणभाऊ पोटे पाटील व कृषी महाविद्यालयाचे संचालक डॉ. डी. टी. इंगोले सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Previous articleएम आई डी सी स्फोटाने हादरली –औद्योगिक सुरक्षा संचनालय आऊट ऑफ रेंज –जिल्हा मुख्यल्यात जागा उपलब्ध तरीही वसई येथेच कार्यालय
Next articleजिल्हा वार्षिक योजना 2021-22 च्या खर्चास जिल्हा नियोजन समितीची मान्यता
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here