Home नांदेड शासनकर्ती जमात होण्यासाठी संघटीत होणं हिच खरी बाबासाहेबांना आदरांजली -भारत सोनकांबळे

शासनकर्ती जमात होण्यासाठी संघटीत होणं हिच खरी बाबासाहेबांना आदरांजली -भारत सोनकांबळे

174
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211206-WA0044.jpg

“शासनकर्ती जमात होण्यासाठी संघटित होणं हिच खरी बाबासाहेबांना आदरांजली”- भारत सोनकांबळे

बेटमोगरा येथील मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्था च्या वतीने महामानव,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरीनिर्वाण दिनानिमीत्त आदरांजली.

नांदेड ब्युरो चीफ/मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क

संपुर्ण जगाला अपल्या विद्वतेच्या आधारावर ओळख निर्माण करणारे अपल्या देशाची रज्यघटना लिहिणारे,भारतीय संविधानाचे एकमेव शील्पकार महामानव,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महपरिनिर्वाण दिनानिमीत्त मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्था या ठिकाणी संस्थेचे सचिव तथा स्वाभिमान भारत न्यूज चे संपादक भारत सोनकांबळे यांच्या संयोजनातून या
अभिवादन व आदरांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले होते.या कार्यक्रमाच्या सुरुवातीस संपुर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय, महाकारूनीक, तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न, बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवर व उपासकांच्या वतीने पुष्पहार अर्पण करुण सामुहीक त्रिशरण पंचशील चे पठण करूण विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महपरिनिर्वान दिनानिमीत्त अभिवादनपर सामुदायीक
आदरांजली वाहीन्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक तथा संस्थेचे सचिव निर्भिड पत्रकार भारत सोनकांबळे यांनी विश्वरत्न,बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महपरिनिर्वान दिनानिमीत्त अभिवादन पर दु:ख व्यक्त करताना आपल्या शोक मनोगतात
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन संघर्ष आणि बाबासाहेबांच्या जीवनातील महत्वपुर्ण पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला ते बोलताना पुढे म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकर जर चार वर्ष अधिकचे जगले असते तर भारत देश आज बलशाली,महासत्ताक राष्ट्र बनला असता. आजचा ६ डिसेंबर
हा डॉ. बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन अर्थात बहुजनांनसाठी संकल्प दिन आहे.खरं पाहील तर बाबांचा महापरिनिर्वाण दिन हा सामान्य, शोषित, पिडीत, बहुजन मागासवर्ग व तमाम भारतीयांसाठी संकल्प दिन आहे. म्हणून आम्ही आज आमच्या देशातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक परिस्थिचा गंभीरतेने विचार करणे आणि लोकशाही जीवनाचे स्वनिरीक्षण व चिंतन करून लोकशाहीला कोणत्या दिशेने नेले जात आहे याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे काळाची गरज आहे असे मत व्यक्त करत शासनकर्ती जमात होण्यासाठी समाजाने संघटीत होणे हीच खरी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली असेल असे या वेळी प्रतिपादन केले. या कार्यक्रमावेळी, दत्ता सोनकांबळे,सागरबाई सोनकांबळे,सज्याबाई सोनकांबळे,हर्षदीप सोनकांबळे,प्रितम सोनकांबळे,संघर्ष सोनकांबळे, इत्यादींची यावेळी उपस्थिती होती.

Previous articleवरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालय पुन्हा सलाईनवर
Next articleजिंतूर तालुक्यातील माजी.आमदार विजय भांबळे यांच्या मुलिच्या गाडीने चौघांना उडवलं..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here