आशाताई बच्छाव
ओल्या पार्टीचा चौकशी अहवाल झाला पुर्ण दोषींवर कारवाई होईल..
लोखंडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.प.) जि.प. बूलडाणा .
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
संग्रामपूर येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय पाटील व इतर चार ग्रामसेवक यांनी दिनांक 12 जुलै 2022 रोजी कार्यालयीन वेळेत केलेल्या ओल्या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याबाबत विविध यूट्यूब चैनल वर व वृत्तपत्रात आणि युवा मराठा न्यूज ला सुद्धा बातमी प्रकाशित झाली होती.त्यावर या मध्यप्राशन करणाऱ्यांवर काय कार्यवाही करण्यात आली या बाबत दिनांक 26जुलै2022रोजी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील दांदळे हे उपकार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.)जिल्हा परिषद कार्यालय बुलढाणा लोखंडे यांच्या कार्यालयात मुलाखत घेण्याकरता गेले असता उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी कॅमेऱ्यासमोर देण्यास नकार दिला म्हणून ऑफ कॅमेरा त्यांनी अशी माहिती दिली की संग्रामपूर गटविकास अधिकारी संजय पाटील व चार ग्रामसेवक यांना ओल्या पार्टी बाबत खुलासा मागवण्यात आला बीडिओ यांनी दिलेल्या खुलास्यावर त्यांच्याविरुद्ध कारवाई करीता शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला. व संबंधित ग्रामसेवक विरुद्ध त्यांच्याकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. त्यावेळेस त्यांच्या कार्यालयात ओल्या पार्टी मधील तिन ग्रामसेवक सुद्धा हजर होते. गट विकास अधिकारी व चार ग्रामसेवक यांच्या ओल्या पार्टी वेळेस बीडिओ यांची विडिओ कॉन्फरन्स द्वारे मीटिंग चालू होती असे बोलले जाते.
त्याबाबत माहिती नसल्याचे लोखंडे यांनी सांगितले. तरी आता अशा बेजबाबदार बेवडेबाजांवर वरिष्ठ कार्याकडून काय कारवाई होते तसेच आज तालूक्यात त्यातील काही ग्रामसेवक यांनी अशी चर्चा केली आहे की आम्ही लोखंडे साहेबांना माफी मागून सर्व प्रकार थांबवला आहे. त्या वर आमचे प्रतिनिधि यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.पं.) जि.प.बुलढाणा लोखंडे यांना भ्रमणध्वनी वरून सदरच्या चालू असलेल्या चर्चेबाबत विचारले असता लोखंडे यांनी सांगितले की ग्रामसेवक यांचा खुलासा प्राप्त झाला आहे यांच्यावर योग्य ती कार्यवाई करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी विसपुते मॕडम कडे प्रकरण पाठविले आहे. त्यावर योग्य ते निर्णय घेण्याचा अधिकार त्यांनाच आहे.तरी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा हे काय कारवाई करतात…? याकडे तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.






