Home नांदेड घरोघरी तिरंगासाठी स्वाभिमानाने पुढे या – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

घरोघरी तिरंगासाठी स्वाभिमानाने पुढे या – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

35
0

आशाताई बच्छाव

IMG-20220805-WA0032.jpg

घरोघरी तिरंगासाठी स्वाभिमानाने पुढे या
– जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका)  :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून प्रत्येक विभाग प्रमुखांनी अधिकाधिक लोकांशी संपर्क साधून त्यांचा सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

घरोघरी तिरंगा अभियानाच्या यशस्वीतेसाठी आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापक बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी व सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील कोणत्याही गरिबाला तिरंगा मिळाला नाही म्हणून त्याच्या आनंदावर विरजन पडता कामा नये. दारिद्रय रेषेखालील कुटूंबांनाही तिरंगा लावता यावा यासाठी उद्योजकांनी सामाजिक उत्तदायित्वाच्या माध्यमातून तिरंगा देण्यासाठी पुढे सरसावे, असेही आवाहनही त्यांनी केले. या मोहिमेच्या प्रसारासाठी प्रत्येक तहसिल कार्यालय आणि पंचायत समिती यांना शासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रत्येक तहसिलदार व पंचायत समिती यांनी विविध उपक्रम हाती घेऊन या उपक्रमाची अधिकाधिक प्रसिद्धी करावी, अशा सूचनाही त्यांनी सर्व तहसिलदारांना दिल्या.

जिल्हा परिषदेतर्फे विशेष ग्रामसभा बोलविण्याबाबत निर्णय झाला आहे. प्रातिनिधीक गावांमध्ये हा ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या असून घरोघरी तिरंगा ग्रामीण भागातील अधिकाधिक घरांवर लावण्याबाबतचे नियोजन केले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली. नांदेड महानगरातील लोकांचा अधिक सहभाग घेण्याच्या उद्देशाने मनपा तर्फे येत्या 10 ऑगस्ट रोजी भव्य मोटार सायकल रॅली आयोजित करण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी दिली. याचबरोबर विविध उपक्रम मनपा तर्फे राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous articleप्रपंत्र (ड )च्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव सादर करून घरकुलचा लाभ द्या निवेदन देऊन उपोषण करण्याचा सुरु करण्याचा इशारा
Next articleभोकरच्या लामाकानीत वृक्षारोपण संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here