Home देश विदेश राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांचा शपथविधी संपन्न

राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांचा शपथविधी संपन्न

69
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220725-192635_Google.jpg

युवा मराठा न्यूज हवेली तालुका प्रतिनिधी  संजय वाघमारे.                                                   देशाची पहिली महिला आदिवासी राष्ट्रपती-आज सोमवार दिनांक २५ जुलै 2022, एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुरमु या प्रचंड बहुमतांनी विजयी झाल्या त्यांचा आज शपथविधी सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पदभार सुपूर्द केला . माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सैन्य दलाचा गार्ड ऑफ ऑनर चा सन्मान देऊन त्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम पार पडला. त्याच दरम्यान भारताची पहिली महिला आदिवासी राष्ट्रपती यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावी झारखंड ओडीसाच्या सीमेवरती मयूरभ्ंज , उपर बेडा या त्यांच्या गावी मांग या नृत्य करून गावकऱ्यांनी आनंदात जल्लोष साजरा केला. राष्ट्रपती होण्यापूर्वी त्या दोन वेळा एमएलए झाल्या त्यानंतर त्यांनी झारखंडचे गव्हर्नर म्हणूनही काम पाहिले त्यांचा जीवन प्रवास खूपच खडतर असा राहिला त्यांनी प्रत्येक अडचणींना सामोरे जाऊन आज एक सामान्य महिला ते राष्ट्रपती पदापर्यंत ची महिला इथपर्यंतचा प्रवास पूर्ण केलाय. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांनी त्यांचे पती व दोन मुलं यांनाही गमावलं तरीही त्या खचल्या नाहीत व त्यांचं आदिवासी समाजातील कार्य व इतर समाजावर कार्य हे प्रामाणिकपणे करत राहिल्या. आशा या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून त्यांचा आज शपथविधी सोहळा संपन्न झाला होता. एक आदिवासी महिला देशाची राष्ट्रपती होऊ शकतात हे आज आपल्या भारताच्या संविधानाने दिलेल्या समान नागरी कायद्याचं खूप मोठं योगदान या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. शपथविधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी महात्मा गांधीजींना आदरांजली व्यक्त केली व मावळत्या राष्ट्रपतींना त्यांनी निरोप दिला आणि हे सांगतानाही विसरले नाहीत की इथून पुढील माझे कार्य हे समाजाच्या प्रत्येक घटकातील व्यक्तींसाठी राहील व कटिबद्ध राहील. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here